1993 बॉम्बस्फोटातील दोषी ताहिर मर्चंटच्या फाशीला स्थगिती

1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील दोषी मोहम्मद ताहिर मर्चंटच्या फाशीच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे.

1993 बॉम्बस्फोटातील दोषी ताहिर मर्चंटच्या फाशीला स्थगिती

नवी दिल्ली : 1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील दोषी मोहम्मद ताहिर मर्चंटच्या फाशीच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे.

7 सप्टेंबरला विशेष टाडा कोर्टानं ताहिरला फाशीची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात ताहिरनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टानं त्याच्या फाशीच्या शिक्षेवर स्थगिती आणली. दरम्यान, मार्च महिन्यात पुढची सुनावणी होणार आहे.

12 मार्च 1993 ला मुंबईतील सीरियल बॉम्बस्फोट खटल्याप्रकरणी 7 सप्टेंबरला ताहिर मर्चंट आणि फिरोज खान यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. याचप्रकरणी करीमुल्लाह खानला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

बॉम्बस्फोटातील काही आरोपींना पाकिस्तानला पाठवल्याप्रकरणी ताहिर मर्चंटला टाडा कोर्टानं त्याला दोषी ठरवलं आहे.

12 मार्च 1993 सा मुबंईत तब्बल 12 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. या बॉम्बस्फोटात 257 जणांचा मृत्यू झाला होता. तर 700 पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. या स्फोटात मोठ्या प्रमाणात आरडीएक्सचा वापर करण्यात आला होता. या स्फोटात 27 कोटींच्या संपत्तीचं नुकसान झालं होतं. याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, टायगर मेमनसह तब्बल 27 आरोपी अद्यापही फरार आहेत.

काय झालं 12  मार्च 1993 रोजी?

पहिला स्फोट : 12 मार्चच्या दुपारी मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीबाहेर दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी देशाला हादरवणारा पहिला बॉम्बस्फोट झाला. या स्फोटाचा आवाज काही किलोमीटरपर्यंत पोहोचला. स्टॉक एक्सेंजच्या 29 व्या मजल्यावरील माणूसही जागच्या जागी पडला, एवढा मोठा हा स्फोट होता. स्फोटाच्या आजूबाजूला रक्ताचा सडा वाहू लागला. स्फोटाठिकाणी जवळपास 2 हजार लोकांची गर्दी होती. बेसमेंटच्या पार्किंगमध्ये आरडीएक्सनी भरलेल्या एका कारमध्ये हा स्फोटा झाला होता. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजबाहेरील या स्फोटात 84 लोकांचा मृत्यू आणि 200 हून अधिक लोक जखमी झाले.

दुसरा स्फोट : दुपारी 2.15 वाजता, नरसी नाथ स्ट्रीट

तिसरा स्फोट : दुपारी 2.30 वाजता, शिवसेना भवन

चौथा स्फोट : दुपारी 2.33 वाजता, एयर इंडिया बिल्डिंग

पाचवा स्फोट : दुपारी 2.45 वाजता, सेंच्युरी बाजार

सहावा स्फोट : दुपारी 2.45 वाजता, माहिम

सातवा स्फोट : दुपारी 3.05 वाजता, झवेरी बाजार

आठ स्फोट : दुपारी 3.10 वाजता, सी रॉक हॉटेल

नववा स्फोट : दुपारी 3.13 वाजता, प्लाझा सिनेमा

दहावा स्फोट : दुपारी 3.20 वाजता, जुहू सेंटॉर हॉटेल

अकरावा स्फोट : दुपारी 3.30 वाजता, सहार विमानतळ

बारावा स्फोट : दुपारी 3.40 वाजता, विमानतळ सेंटॉर हॉटेल

 

बॉम्बस्फोटानंतर काय झालं?

 

 • 4 नोव्हेंबर 1993 रोजी 10 हजार पानांचं 189 जणांविरोधात पहिलं आरोपपत्र दाखल • 19 नोव्हेंबर 1993 रोजी प्रकरणं सीबीआयकडे सुपूर्द • 19 एप्रिल 1995 रोजी मुंबईतील टाडा कोर्टात सुनावणी सुरु • टाडा कोर्टाकडून आरोपींविरोधात आरोप निश्चिती • ऑक्टोबर 2000 मध्ये सरकारी पक्षाच्या साक्षीदारांचे जबाब घेतले गेले • ऑक्टोबर 2001 मध्ये सरकारी पक्षाचा युक्तीवाद पूर्ण • सप्टेंबर 2003 मध्ये संपूर्ण प्रकरणाची सुनावणी पूर्ण • सप्टेंबर 2006 मध्ये कोर्टाने निर्णय देणं सुरु केलं • या प्रकरणात एकूण 123 आरोपी होते, ज्यामधील 12 जणांना कनिष्ठ कोर्टाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. यामधील 20 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली, ज्यामधील दोघांचा मृत्यू झाला आहे.  याशिवाय इतर 68 जणांना जन्मठेपेहून कमी शिक्षा सुनावली गेली होती. मात्र, त्यातील 23 जण निर्दोष सुटले. • नोव्हेंबर 2006 मध्ये बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला पिस्तूल आणि एके-56 रायफल्स ठेवल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. • 1 नोव्हेंबर 2011 मध्ये सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु झाली • सुप्रीम कोर्टात 10 महिने सुनावणी सुरु राहिली • ऑगस्ट 2012 मध्ये सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला. 2006 साली मुंबई कोर्टाने सुनावणीत निर्णय दिला, ज्यामध्ये एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा समावेश होता. त्यामध्ये याकूब मेमन, यूसूफ मेमन, इसा मेमन आणि रुबिना मेमन यांचा समावेश होता. या सर्वांवर बॉम्बस्फोटाचा कट आणि दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. • मुंबईच्या टाडा कोर्टाने याकूबला फाशी सुनावल्यानंतर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. अनेव वाद-विवादांनंतर अखेर 30 जुलै सकाळी 7 वाजता याकूब मेमनला फाशी देण्यात आली.


याकूब मेमनच्या बाबतीत आतापर्यंत काय झालं?

सप्टेंबर 2012- मेमन कुटुंबातील 4 सदस्यांना कोर्टाने दोषी ठरवलं

21 मार्च 2013- सुप्रमी कोर्टाने याकूब मेमनची फाशी कायम ठेवली. इतर 10 जणांची फाशी जन्मठेपेत बदलली. आधी जन्मठेप सुनावलेल्या 18 पैकी 16 जणांची जन्पठेप सुप्रीम कोर्टाने कायम ठेवली

30 जुलै 2013- याकूब मेमनची पहिली पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

14 ऑगस्ट 2013- डेथ वॉरन्टची तारिख निश्चित झाली

11 एप्रिल 2014- राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी याकूब मेमनची दया याचिका फेटाळली

2 जून 2014- फाशीच्या शिक्षेविरोधात याकूब मेमनने केलेल्या पुनर्विचार याचिकेवर चेंबरऐवजी ओपन कोर्टमध्ये सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली.

9 एप्रिल 2015- फाशीविरोधातील दुसरी पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

21 जून 2015- 30 जुलैला होणारी फाशी रोखण्यासाठी याकूब मेमनची सुप्रीम कोर्टात धाव

27 जुलै 2015- क्युरेटिव्ह पिटीशनच्या सुनावणीवरुन वाद

28 जुलै 2015- सुप्रीम कोर्टाच्या दोन न्यायाधीशांमध्ये याकूबवरुन मतभेद

29 जुलै 2015- सुप्रीम कोर्टाने याकूबची फाशीविरोधातील याचिका फेटाळली. राष्ट्रपतींनीही दयायाचिका फेटाळली.

30 जुलै 2015- सकाळी 7 वाजता याकूब मेमनला नागपूर सेंट्रल जेलमध्ये फाशी देण्यात आली.

संबंधित बातम्या :

मुंबई बॉम्बस्फोट : 12 मार्च 1993 ते 30 जुलै 2015... काय झालं या 22 वर्षात?


मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: The Supreme Court’s stay on the death sentence of Tahir Merchant, convicted in 1993 bomb blast case latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV