CCTV : भरदिवसा कारची काच फोडून 28 तोळ्यांचे दागिने लंपास

भरदिवसा काच फोडून लाखोंचे दागिने लंपास करणारा चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

CCTV : भरदिवसा कारची काच फोडून 28 तोळ्यांचे दागिने लंपास

कल्याण : कल्याणमध्ये भरदिवसा 7 लाखांचे दागिने गाडीतून लंपास करण्यात आले. कल्याणमधील बांधकाम व्यवसायिक अजय सिंग यांचे ते दागिने होते.

बँकेच्या लॉकरमधून दागिने काढून त्यांनी गाडीत ठेवले. हॉटेल सरोवरजवळ रस्त्याच्या कडेला काही वेळासाठी गाडी पार्क केली असता, कारची काच फोडून मागच्या सीटवरुन हे दागिने चोरट्यांनी लांबवले.

या बॅगमध्ये 28 तोळे सोन्याचे दागिने, तर आर्धा किलो चांदीचे दागिने होते. घरात लग्नकार्य असल्यामुळे त्यांनी हे दागिने बँकेतून काढले होते.

भरदिवसा काच फोडून लाखोंचे दागिने लंपास करणारा चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सध्या कोळसेवाडी पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा शोध घेत आहेत.

पाहा व्हिडीओ :

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Thief stolen jewellery from car latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV