पनवेल महापालिकेच्या आयुक्तांना जीवे मारण्याची धमकी

वेळ पडल्यास तोंडाला काळे फासू आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचीही धमकी या पत्रातून देण्यात आली आहे.

पनवेल महापालिकेच्या आयुक्तांना जीवे मारण्याची धमकी

नवी मुंबई : पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हे पत्र नेमकं कुणी पाठवलं, हे अद्याप कळू शकलेलं नाही.

महापालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांच्यासह उपायुक्त समीर लेंगरेकर आणि सहाय्यक आयुक्त संध्या बालनकुळे यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

“नगरसेवकांचे ऐका. शिवाय नगरसेवकांचे अधिकार संपवू नका. झोपडपट्ट्यांवर कारवाई करु नये, पालिकेतील ठेकेदारांवर कारवाई करु नये.” अशा धमक्या या पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत.

शिवाय, वेळ पडल्यास तोंडाला काळे फासू आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचीही धमकी या पत्रातून देण्यात आली आहे.

सुधाकर शिंदे कोण आहेत?

सुधाकर शिंदे हे पनवेल महापालिकेचे विद्यामान आयुक्त आहेत. पनवेल महापालिकेची स्थापना झाल्यानंतर त्यांची नियुक्ती झाली. राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांचे ते बंधू आहेत.

संबंधित बातमी : सुधाकर शिंदे पनवेल महापालिकेच्या आयुक्तपदी

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: threatens to panvel municipal commissioner latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV