जीएसटीसाठी विशेष अधिवेशन, शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

जीएसटीसाठी विशेष अधिवेशन, शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

मुंबई: जीएसटीनिमित्त शनिवारपासून तीन दिवसाचं विशेष अधिवेशन मुंबईत होणार आहे. जीसएटी विधेयक केंद्रात मंजूर झालं असून आता राज्यात जीएसटी मंजूर करुन घेण्याचा सोपस्कार पार पाडल जाणार आहे. मात्र, असं असलं तरी विरोधकांबरोबर शिवसेनेनंही पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा काढला आहे. त्यामुळे सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत.

 

विरोधकांच्या संघर्ष यात्रेचा शेवटचा टप्पा नुकताच कोकणात पार पडला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर यात्रा संपली तरी संघर्ष सुरूच ठेवणार अशी भूमिका विरोधी पक्षांनी घेतली आहे. जीएसटी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी बैठक घेत पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन सरकारला घेरण्याची रणनिती आखली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन हे विरोधकांच्या बहिष्काराने गाजले होते. तेव्हा हे जीएसटी अधिवेशन विरोधकांच्या आंदोलनामुळे पुन्हा एकदा गाजण्याची चिन्हे आहेत.

 

एकीकडे विरोधकांनी भाजपा सरकार विरोधात कंबर कसली असताना सत्तेत असलेल्या शिवसेनेनंही कर्जमाफी मुद्द्यावरुन नाशिकला शेतकरी अधिवेशन घेत वातावरण तापवायला सुरुवात केली आहे. शेतकरी मुद्द्यावरुन विविध आंदोलने करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सेनेला साथ दिली आहे.

 

जीएसटी मंजूर करण्याचा सोपस्कार जरी पार पाडला जाणार असला तरी शेतकरी कर्जमाफी आणि शेतकरी आत्मम्हत्या या मुद्दयांचे पडसाद या अधिवेशान नक्कीच उमटतील. त्यामुळे भाजपा पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन शिवसेनेची समजूत घालतो की, विरोधकांचा सामना कसा करतो यावर पुढच्या राजकीय घडामोडी अवलंबून असणार आहेत.

First Published: Friday, 19 May 2017 10:24 PM

Related Stories

मतदानाआधी भिवंडीत कारमधून 60 लाखांची रोकड जप्त
मतदानाआधी भिवंडीत कारमधून 60 लाखांची रोकड जप्त

भिवंड : भिवंडी महापालिका निवडणुकीसाठी उद्या (24 मे) मतदान होणार

मीराची प्रसुती करणारा डॉक्टर बेपत्ता, शाहिदकडून मदतीचं आवाहन
मीराची प्रसुती करणारा डॉक्टर बेपत्ता, शाहिदकडून मदतीचं आवाहन

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरने ट्विटरवर चाहत्यांकडून मदत

राज्यातील सर्वच टोल माफ करा, मुंबईतील नगरसेवकांची मागणी
राज्यातील सर्वच टोल माफ करा, मुंबईतील नगरसेवकांची मागणी

मुंबई : राज्यातील सर्वच टोल माफ करावेत, अशी मागणी मुंबई

मुंबई विमानतळावरील जीव्हीके टोलनाका शिवसेनेने बंद पाडला!
मुंबई विमानतळावरील जीव्हीके टोलनाका शिवसेनेने बंद पाडला!

मुंबई : मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळासंदर्भातील एबीपी माझाच्या

अवघ्या आठ तासात तेजस करमाळीत दाखल
अवघ्या आठ तासात तेजस करमाळीत दाखल

करमाळी : अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेली तेजस ट्रेन काल गोवाच्या

मुंबईतून 12 वर्षांपासून बेपत्ता, नबी शेखला पाकिस्तानात अटक
मुंबईतून 12 वर्षांपासून बेपत्ता, नबी शेखला पाकिस्तानात अटक

मुंबई: मुंबईतून मागच्या १२ वर्षांपासून बेपत्ता असलेला व्यक्तीला

GVK विरोधात गुन्हा नोंदवू शकत नाही, मनसेला पोलिसांचं उत्तर
GVK विरोधात गुन्हा नोंदवू शकत नाही, मनसेला पोलिसांचं उत्तर

मुंबई : मुंबई विमानतळावर एन्ट्री फीच्या नावे सुरु असणारी लूट कायम

 राणे विरुद्ध परब, विधानपरिषदेत जुगलबंदी
राणे विरुद्ध परब, विधानपरिषदेत जुगलबंदी

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे आणि शिवसेनेचे आमदार

कॉकपीटमधून धूर निघाल्यानं एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग!
कॉकपीटमधून धूर निघाल्यानं एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी...

मुंबई : मुंबई विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग

जयंत पाटलांना सत्तेत येण्याची घाई: मुनगंटीवार
जयंत पाटलांना सत्तेत येण्याची घाई: मुनगंटीवार

मुंबई: जीएसटी विधेयकासाठी बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनाच्या