कमला मिल आगीप्रकरणी आणखी तीन जणांना अटक

मुंबईतील एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी ही कारवाई केली.

कमला मिल आगीप्रकरणी आणखी तीन जणांना अटक

मुंबई : कमला मिल आगीप्रकरणी आणखी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये कमला मिलचा संचालक भंडारी, हुक्का कंपनी निर्वाणाचा मालक पांडे आणि फायर ब्रिगेड अधिकारी पाटील यांचा समावेश आहे. एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी ही कारवाई केली.

दरम्यान, कमला मिलमधील आग ही मोजो बिस्त्रोतील हुक्का पार्लरमुळेच लागल्याचा अहवाल मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला होता. यानंतर मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

खोटा अहवाल देणारा अधिकारी अटकेत

मोजोस बिस्त्रो आणि वन अबोव्ह पबमध्ये अग्निरोधक यंत्रणेचे नियम पूर्ण असल्याचा खोटा अहवाल ज्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिला होता, त्याला अटक करण्यात आली आहे. आग लागण्याच्या काही दिवसांपूर्वीच हा अहवाल देण्यात आला होता. या अहवालानंतरच हे रेस्टॉरंट चालण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र हा खोटा अहवाल दिल्याचं लक्षात आल्यानंतर आता या अधिकाऱ्यावरही अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणात आणखी काही मोठ्या अधिकाऱ्यांना अटक होण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांच्या हाती जो अहवाल लागला आहे, त्यात आणखी काही मोठ्या अधिकाऱ्यांची नावं आहेत. त्यामुळे या प्रकरणी मोठी कारवाई होऊ शकते.

मोजो बिस्त्रोतील हुक्का पार्लर विनापरवाना गच्चीवर थाटण्यात आलं होतं. त्या जागेचे आणि रेस्टॉरन्ट मालक या आगीला जबाबदार असल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, हा अहवाल सार्वजनिक करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या अहवालानुसार अग्निशमन दलातील 10 अधिकाऱ्यांची खातेअंतर्गत चौकशी होणार आहे. तर दोन वॉर्ड ऑफिसर आणि आरोग्य अधिकाऱ्यांचाही चौकशीत समावेश असेल.

29 डिसेंबरला मध्यरात्री कमला मिलमधील मोजोस आणि वन अबव्ह पबला लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला होता.

काय आहे प्रकरण?

मुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल्स कम्पाऊंडमधील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता.

गुरुवार 29 डिसेंबरच्या मध्यरात्री ही भीषण आग लागली होती. यावेळी इथे मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. काही कळायच्या आतच आगीने रौद्ररुप धारण केलं आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: three peoples including fire brigade officer arrested in Kamala mill fire case
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV