बाराव्या मजल्यावरुन पडून टिटवाळ्यात चिमुरड्याचा मृत्यू

घरातील सर्व जण झोपले असताना बाल्कनीतून डोकावताना खाली पडून चार वर्षांच्या उमेशचा मृत्यू झाला.

बाराव्या मजल्यावरुन पडून टिटवाळ्यात चिमुरड्याचा मृत्यू

कल्याण : बाराव्या मजल्याच्या बाल्कनीतून पडून चार वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. टिटवाळ्यात घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

चार वर्षांच्या उमेश देवासेचा बाल्कनीतून खाली पडून मृत्यू झाला.

मूळचे राजस्थानचे असलेले उमेशचे वडील किसन देवासे हे महिनाभरापूर्वीच टिटवाळा पूर्वेकडील रिजन्सी सर्वम संकुलात राहायला आले होते. बुधवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास ते आपल्या कुटुंबासह गावाहून परत आले. प्रवासात थकवा आल्यामुळे सर्व कुटुंबीय दुपारच्या सुमारास झोपले होते.

याच वेळी किसन यांचा चार वर्षांचा मुलगा उमेश उठून बाल्कनीत गेला. उमेश खाली वाकून पाहत असताना त्याचा तोल गेला आणि तो खाली पडल्याची माहिती आहे. या घटनेत उमेशचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Titwala : Child dies on the spot after falling from twelfth floor latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV