मुंबईत एका शिक्षकाकडून दुसऱ्या शिक्षकाची हत्या

मुंबईतील मालाड मालवणी परिसरात एका शिक्षकाने दुसऱ्या शिक्षकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना काल (गुरुवार) रात्री घडली.

मुंबईत एका शिक्षकाकडून दुसऱ्या शिक्षकाची हत्या

मुंबई : मुंबईतील मालाड मालवणी परिसरात एका शिक्षकाने दुसऱ्या शिक्षकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना काल (गुरुवार) रात्री घडली.

आपल्या ट्युशन क्लासमधील मुले दुसऱ्या ट्युशन क्लासमध्ये शिकायला गेल्याच्या रागातून एका शिक्षकाने दुसऱ्या शिक्षकाची हत्या केल्याच्या प्रकार घडला आहे. मालाड मालवणी परिसरातील अबुजवाडीमध्ये विजय नावाच्या शिक्षकाचा खासगी क्लास आहे. त्याच्या क्लासमधील इतर शिक्षकांनी समोरच असणाऱ्या अरुप बिश्वास यांच्या क्लासमध्ये शिकवण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे त्याच्या क्लासमधील अनेक मुलं ही अरुप यांच्या क्लासमध्ये जात होती.

याच रागातून विजयने काल अरुप बिश्वास यांच्यावर धारधार चाकूने वार केले. दरम्यान,  अरुप यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Tuition class Teacher Murder in Mumbai latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV