तुकाराम मुंढे यांच्यासह राज्यातील सहा सनदी अधिकाऱ्यांची बदली

नाशिक महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांची बदली करण्यात आली आहे.

तुकाराम मुंढे यांच्यासह राज्यातील सहा सनदी अधिकाऱ्यांची बदली

मुंबई : नाशिक महापालिकेचे आयुक्त म्हणून लवकरच तुकाराम मुंढे पदभार स्वीकारणार आहेत. नाशिक महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पीएमपीएमएलचे अध्यक्ष असलेल्या तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शिस्तप्रिय आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी अशी ओळख असलेले तुकाराम मुंढे यांची नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावरुन पुण्यात पीएमपीएमएलच्या अध्यक्ष आणि संचालकीय व्यवस्थापकपदी बदली करण्यात आली होती. नवी मुंबईप्रमाणेच पुण्यातही राजकारण्यांशी त्यांचे खटके उडाले.

नवी मुंबईत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने तुकाराम मुंढे यांच्यावर अविश्वास ठराव आणला होता. राजकीय वातावरण तापल्यानंतर तुकाराम मुंढे यांची बदली पुण्यात करण्यात आली. तुकाराम मुंढे यांच्या शिस्तीचा फटका पुण्यातील राजकारण्यांनाही बसला. शिवाय कर्मचाऱ्यांनीही तुकाराम मुंढेंच्या कारभाराची धास्ती घेतली होती.

राज्यातील सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

  1. सार्वजनिक बांधकाम विभागाचे व्यवस्थापकीय सहसंचालक (मुंबई) के. व्ही. कुरुंदकर यांची मंत्रालयात कृषी आणि पशुपालन, दुग्ध आणि मत्स्यपालन विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती

  2. पीएमपीएमएलचे संचालकीय व्यवस्थापक तुकाराम मुंढे यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी बदली

  3. नाशिक महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांची एमआयडीसीचे संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई येथे बदली.

  4. नैना गुंडे यांची पीएमपीएलएमच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती

  5. पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रातार यांची मंत्रालयात सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या उपसचिव म्हणून बदली

  6. दीपक कुमार मीना यांची महानंदचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Tukaram mundhe transferred to Nashik municipal corporation commissioner
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV