GST कायद्यान्वये पहिली अटक, मुंबईतील व्यावसायिकांना बेड्या

व्यापारी कागदोपत्री खोटा व्यवहार दाखवून टॅक्स इनपुट क्रेडिट वाढवत होते. जेणेकरुन जमा रकमेच्या आधारे लेटर ऑफ क्रेडिट दाखवून बँकेला फसवण्याच्या तयारीत हे व्यावसायिक होते, असेही जीएसटी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

GST कायद्यान्वये पहिली अटक, मुंबईतील व्यावसायिकांना बेड्या

मुंबई : जीएसटी कायदा बनल्यानंतर देशात पहिल्यांदाच या कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे. जीएसटी अधिकाऱ्यांनी मुंबईतील दोन व्यावसायिकांवर इनपुट टॅक्स क्रेडिटमध्ये गैरव्यवहार करण्याच्या आरोपाखाली कारवाई करण्यात आली.

शाह ब्रदर्स इस्पात प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक संजीव मेहता आणि व्ही. एन. इंडस्ट्रीजचे संचालक विनयकुमार आर्या यांना जीएसटी कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे. संजीव मेहता यांच्यावर 5.20 कोटी, तर विनयकुमार आर्या यांच्यावर 2.03 कोटींचे इनपुट टॅक्स क्रेडिट जमा करण्याचा आरोप आहे.

मुंबईचे जीएसटी आयुक्त डॉ. के. एन. राघवन यांच्या माहितीनुसार, मेहता आणि आर्या या दोघांवरही सामान पुरवठा न करता केवळ कागदोपत्री व्यावसाय करुन इनपुट टॅक्स क्रेडिट जमा करण्याचा आरोप आहे.

जीएसटी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, विनयकुमार आर्या यांना अटक करताच, रक्कम भरल्यानंतर जामीन मिळाला, तर संजीव मेहता यांना कोर्टात हजर केले गेले, त्यानंतर रक्कम भरुन जामीन देण्यात आला.

व्यापारी कागदोपत्री खोटा व्यवहार दाखवून टॅक्स इनपुट क्रेडिट वाढवत होते. जेणेकरुन जमा रकमेच्या आधारे लेटर ऑफ क्रेडिट दाखवून बँकेला फसवण्याच्या तयारीत हे व्यावसायिक होते, असेही जीएसटी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

जेणेकरुन जीएसटी चुकवून कोण कोण व्यापार करुन सरकारी तिजोरीला चुना लावत आहे, हे कळण्यासाठी जीएसटी विभागाने आता चौकशीला वेग दिला आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Two businessman arrested under GST Act from Mumbai
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV