युतीची चर्चा लांबणीवर, उद्धव ठाकरेंनी मुनगंटीवारांशी भेट नाकारली

सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना भेटीसाठी वेळ मागितली होती. मात्र उद्धव ठाकरेंनी वेळ दिली नाही.

युतीची चर्चा लांबणीवर, उद्धव ठाकरेंनी मुनगंटीवारांशी भेट नाकारली

मुंबई : भाजपचे नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटण्यासाठी तूर्तास तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नकार दिला आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना भेटीसाठी वेळ मागितली होती. मात्र उद्धव ठाकरेंनी वेळ दिली नाही.

उद्धव ठाकरेंनी भेट नाकारल्यामुळे शिवसेना आणि भाजप युतीची चर्चा लांबणीवर पडली आहे. अहमदनगरमध्ये शिवसैनिकांचं झालेलं दुहेरी हत्यांकाड, नाणार प्रकल्पाला वाढता विरोध, यामुळे युतीच्या चर्चेला खीळ बसल्याची सूत्रांची माहिती आहे.

याआधीच शिवसेनेने भविष्यात भाजपशी कुठलीही युती करणार नाही, असं स्पष्ट केलं होतं. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कालच बोलताना याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. 'भाजपने आमचा मुका घेतला तरी, आता युती होणार नाही,' तसेच, शिवसेना सत्ताधारी नसून फक्त टेकूधारी आहे आणि राजकीय अस्थिरता टाळण्यासाठी सत्तेत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता.

दरम्यान, आगामी सर्व निवडणुका शिवेसना स्वबळावर लढणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मेळाव्यातूनच जाहीर केलं होतं.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Uddhav thackeray denied to meet with Sudhir mungantiwar
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV