मुंबईतील शेतकऱ्यांची खातरजमा करा: उद्धव ठाकरे

Uddhav Thackerays reaction on Farmers loan waiver from Mumbai

मुंबई:  “मुंबईमध्ये शेतकरी असल्याचे सांगितले जात आहे. मला याबाबत काहीही माहीत नाही. पण एकदा सरकारने खातरजमा करायला हवी असा चिमटा काढत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आम्ही अधांतरी सोडणार नाही”, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिला.

शिवसेनेच्या ‘शिवालय’ या कार्यालयाचं उद्घाटन आज उद्धव यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. मुंबई मेट्रोचे काम सुरू असल्याने शिवसेनेचे पक्ष कार्यालयात मंत्रालयाजवळा स्थलांतरित करण्यात आले आहे.

यावेळी बोलताना उद्धव म्हणाले, “मुख्यमंत्री जर म्हणत आहेत की, कर्जमाफीने 89 लाख शेतकऱ्यांना लाभ होईल तर त्यांची यादी आणि 40 लाख सातबारा कोरा झालेल्या शेतकऱ्यांची यादी आम्ही विधानसभेत मागणार आहोत. त्यावेळीच कर्जमाफीचा पारदर्शीपणा स्पष्ट होईल”.

याशिवाय मराठवाड्यासह राज्यात पुन्हा 9 जुलैपासून मी दौरा करणार असून शेतकऱ्यांशी पुन्हा संवाद साधणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

मुंबईतल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी!

मुंबईतील 813 शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचा उल्लेख मुख्यमंत्री कार्यलयाने प्रकाशित केलेल्या आकडेवारीत आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुंबई शहर जिल्ह्यात 694 शेतकऱ्यांना, तर मुंबई उपनगर जिल्ह्यात 119 शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे कर्जमाफी मिळालेल्यांमध्ये मुंबई उपनगरापेक्षा मुंबई शहरातील शेतकरी जास्त आहेत. मुंबई शहरात नक्की कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे, असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.

संबंधित बातम्या

मुंबईतील 813 शेतकऱ्यांसह राज्यातील कर्जमाफी…

Agriculture News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Uddhav Thackerays reaction on Farmers loan waiver from Mumbai
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

येत्या दोन वर्षात ऊसाचं 3 लाख 5 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार
येत्या दोन वर्षात ऊसाचं 3 लाख 5 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

मुंबई : आगामी दोन वर्षात राज्यातील ऊस पिकाखालील 3 लाख 5 हजार हेक्टर

ऊस लागवडीसाठी ठिबक सिंचन बंधनकारक, मंत्रिमंडळाचा निर्णय
ऊस लागवडीसाठी ठिबक सिंचन बंधनकारक, मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई: यापुढे तुम्हाला ऊस लागवड करायची असेल, तर त्यासाठी ठिबक सिंचन

आकडेवारी : आतापर्यंत महाराष्ट्रात किती पाऊस पडला?
आकडेवारी : आतापर्यंत महाराष्ट्रात किती पाऊस पडला?

मुंबई : गेले काही दिवस राज्यभरात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे

येत्या 72 तासात संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस, हवामान खात्याचा नवा अंदाज
येत्या 72 तासात संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस, हवामान खात्याचा नवा अंदाज

मुंबई : हवामान खात्याने पुन्हा एकदा पावसाचा नवा अंदाज वर्तवला आहे.

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 09/07/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 09/07/2017

  गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिवसेना आमदार, खासदार आणि मंत्र्यांची

तीन ते चार दिवसात पावसाचं पुनरागमन, हवामान खात्याचा अंदाज
तीन ते चार दिवसात पावसाचं पुनरागमन, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने बळीराजा

वर्ध्यात शेतीमालासाठी 'रुरल मॉल' उभारणार
वर्ध्यात शेतीमालासाठी 'रुरल मॉल' उभारणार

वर्धा: शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध

राजू शेट्टींची किसान मुक्ती यात्रा, मेधा पाटकर, योगेंद्र यादवही सहभागी
राजू शेट्टींची किसान मुक्ती यात्रा, मेधा पाटकर, योगेंद्र यादवही...

भोपाळ: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या

कर्जमाफी योजनेत 2009 नंतरच्या थकीत कर्जदारांचाही समावेश
कर्जमाफी योजनेत 2009 नंतरच्या थकीत कर्जदारांचाही समावेश

मुंबई : कर्जमाफीच्या ऐतिहासिक योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय

लवकरच मुंबईतील शेतकऱ्यांची नावं जाहीर करणार : मुख्यमंत्री
लवकरच मुंबईतील शेतकऱ्यांची नावं जाहीर करणार : मुख्यमंत्री

मुंबई : मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हँडलवरुन जाहीर करण्यात