काकाच्या दुकानातून सोनं चोरी, पुतण्यासह नोकर अटकेत

उल्हासनगरमध्ये काकाच्या दुकानातून साडेआठ लाखांचं सोनं घेऊन पुतण्याने नोकरासह पोबारा केला होता.

काकाच्या दुकानातून सोनं चोरी, पुतण्यासह नोकर अटकेत

उल्हासनगर : सख्ख्या काकाच्या दुकानातून 29 लाख रुपयांचं सोनं चोरणाऱ्या पुतण्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. उल्हासनगरच्या हिल लाईन परिसरात हा प्रकार घडला. आरोपीकडून चोरीचं सोनं, रोख रक्कम आणि गाडी असा एकंदरीत 29 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

डोंबिवलीत राहणाऱ्या किशनसिंग चौहान यांचं नेवाळी नाक्यावर ज्वेलर्सचं दुकान आहे. त्यांच्या दुकानात पुतण्या श्रवणसिंग चौहान आणि नोकर पुरणसिंग राठोड काम करत होते. या दोघांनी काही दिवसांपूर्वी दुकानातून साडेआठ लाखांचं सोनं घेऊन पोबारा केला होता.

या प्रकरणी हिललाईन पोलिसांनी राजस्थानपर्यंत माग काढून त्यांना बेड्या ठोकल्या. चौकशीत त्यांनी आतापर्यंत अनेक वेळा दुकानातून सोनं चोरल्याची कबुली दिली. या चोरलेल्या एक किलो सोन्यासह सोनं विकून आलेली साडेचार लाख रुपयांची रोकड, आणि त्याच पैशातून घेतलेली एक कारही पोलिसांनी जप्त केली.

या सगळ्या मुद्देमालाची एकूण किंमत तब्बल 29 लाख रुपये इतकी आहे. या प्रकरणी या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून पोलिस गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Ulhasnagar : Nephew arrested with servant for stealing gold from uncle’s jewellery shop latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV