ठाण्यातल्या अनधिकृत टेलिफोन एक्सेंजचा पर्दाफाश, चार आरोपी ताब्यात

By: अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे | Last Updated: Thursday, 18 May 2017 8:32 PM
ठाण्यातल्या अनधिकृत टेलिफोन एक्सेंजचा पर्दाफाश, चार आरोपी ताब्यात

ठाणे : सर्व सरकारी यंत्रणांना अंधारात ठेवून ठाण्यात चोरीछुपे अनधिकृत टेलिफोन एक्सेंज सुरू करण्यात आलं होतं. ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेनं या अनधिकृत टेलिफोन एक्सेंजचा पर्दाफाश केला असून 4 जणांना अटक केली आहे.

कुणालाही कानोकान खबर न लागू देता आरोपींनी इंटरनॅशनल कॉल करण्याची यंत्रणा उभी केली होती. त्यामुळं या टेलिफोन एक्सेंजचा वापर देशविघात कृत्यासाठी तर करण्यात येत नव्हता ना, याचा पोलीस तपास करत आहेत. या अनधिकृत टेलिफोन एक्सेंजमुळं सरकारचा 30 कोटींचा महसूल बुडाल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे.

विशेष म्हणजे, सुरक्षा यंत्रणेला ट्रेस करता येऊ नये, यासाठी आंतरराष्ट्रीय कॉल व्हीओआयपीद्वारे कॉल प्राप्त करत होते. त्यानंतर बनावट एक्सेंजद्वारे तो कॉल डोमेस्टिक कॉलमध्ये ट्रान्सफर करुन इच्छित भारतीयच्या लॅण्डलाइन किंवा मोबाईलशी जोडला जात होता.

या प्रकरणी ठाणे पोलिसांनी चार आरोपीना अटक केली असून पाचवा आरोपी ताब्यात घेतला आहे . पोलिसांनी एक्सेंजमधून 17 लाख 54 हजाराचा मुद्देमालही जप्त केला आहे.

या बोगस एक्सेंजचा उपयोग हवाला आणि अन्य गैरकृत्यासाठी वापरण्यात येत असावा  संशय पोलिसांना आहे. त्या दिशेने पोलीस पथक तपास करीत आहे.

First Published: Thursday, 18 May 2017 8:32 PM

Related Stories

GVK विरोधात गुन्हा नोंदवू शकत नाही, मनसेला पोलिसांचं उत्तर
GVK विरोधात गुन्हा नोंदवू शकत नाही, मनसेला पोलिसांचं उत्तर

मुंबई : मुंबई विमानतळावर एन्ट्री फीच्या नावे सुरु असणारी लूट कायम

 राणे विरुद्ध परब, विधानपरिषदेत जुगलबंदी
राणे विरुद्ध परब, विधानपरिषदेत जुगलबंदी

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे आणि शिवसेनेचे आमदार

कॉकपीटमधून धूर निघाल्यानं एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग!
कॉकपीटमधून धूर निघाल्यानं एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी...

मुंबई : मुंबई विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग

जयंत पाटलांना सत्तेत येण्याची घाई: मुनगंटीवार
जयंत पाटलांना सत्तेत येण्याची घाई: मुनगंटीवार

मुंबई: जीएसटी विधेयकासाठी बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनाच्या

महाराष्ट्र विधानसभेत GST विधेयक एकमताने मंजूर
महाराष्ट्र विधानसभेत GST विधेयक एकमताने मंजूर

मुंबई : महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विधेयक अर्थात जीएसटी विधानसभेत

हायटेक तेजसच्या प्रवासासाठी 780 ते 2740 रुपये तिकीट
हायटेक तेजसच्या प्रवासासाठी 780 ते 2740 रुपये तिकीट

मुंबई : कोकण आणि गोवावासियांसाठी पर्वणी ठरणारी तेजस एक्स्प्रेस

केवळ साडे 8 तासात मुंबई-गोवा... हायटेक ‘तेजस’ सज्ज!
केवळ साडे 8 तासात मुंबई-गोवा... हायटेक ‘तेजस’ सज्ज!

मुंबई: मुंबई ते गोवा धावणारी ‘तेजस’ आजपासून (सोमवार) मुंबईतून

तुफान डायलॉगबाजी, सभागृहात हास्यकल्लोळ, जयंत पाटलांचं भाषण जसंच्या तसं
तुफान डायलॉगबाजी, सभागृहात हास्यकल्लोळ, जयंत पाटलांचं भाषण...

मुंबई : कटप्पानं बाहुबलीला का मारलं, याचं उत्तर सगळ्यांनाच मिळालं

भिवंडीत कारमध्ये स्फोटकांचा मोठा साठा जप्त, तिघांना अटक
भिवंडीत कारमध्ये स्फोटकांचा मोठा साठा जप्त, तिघांना अटक

भिवंडी : भिवंडीजवळच्या अंबाडी नाका भागातून मोठ्या प्रमाणात

'तेजस'वर समाजकंटकांची वक्रदृष्टी, काचा फोडल्या
'तेजस'वर समाजकंटकांची वक्रदृष्टी, काचा फोडल्या

मुंबई : भारतीय रेल्वेचा वेग वाढवणारी सुपरफास्ट हायटेक ट्रेन तेजस