अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम नैराश्येच्या गर्तेत!

ज्याच्या इशाऱ्यावर गुन्हेगारी विश्वाची सूत्र हलतात, तो दाऊद इब्राहिम कासकर सध्या नैराश्याच्या गर्तेत बुडाला आहे. दाऊदच्या नैराश्येमागे त्याच्या मुलाने घेतलेल्या निर्णय असल्याचं बोललं जात आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम नैराश्येच्या गर्तेत!

ठाणे : ज्याच्या इशाऱ्यावर गुन्हेगारी विश्वाची सूत्र हलतात, तो दाऊद इब्राहिम कासकर सध्या नैराश्याच्या गर्तेत बुडाला आहे. दाऊदच्या नैराश्येमागे त्याच्या मुलाने घेतलेल्या निर्णय असल्याचं बोललं जात आहे.

मोईन कासकर हा दाऊदचा सर्वात लाडका मुलगा. मात्र, मोईननं आता मौलवी बनण्याचा निर्णय घेतला आहे. वडिलांच्या काळ्या धंद्यांमुळं कुटुंबाची जगभर नालस्ती होते, आणि त्यामुळं मोईनन वडिलांच्या काळ्या धंद्याच्या जगताची सूत्र स्वीकारण्याऐवजी मौलवी बनण्याचा निर्णय घेतल्याचं समजतं आहे.

सध्या ठाणे खंडणीविरोधी पथकाच्या ताब्यात असेलला दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकारनं हा मोठा गौप्यस्फोट केला आहे. एवढंच नव्हे तर दाऊदचा मुलगा मोईननं अख्खं कुराण मुखोद्त केलं असल्याचंही सांगण्यात येत आहे.

त्याशिवाय, कराचीतल्या पॉश अशा क्लिफ्टनमधील अलिशान बंगल्याचाही त्याने त्याग केला आहे. सध्या तो याच घराजवळच्या मशिदीत भिक्षू म्हणून राहात आहे. मात्र, त्याची पत्नी सानिया आणि तीन मुलींनी त्याची साथ सोडलेली नाही.

मशिद प्रशासनाकडून देण्यात आलेल्या एका लहानशा घरात दाऊदच्या मुलाचं कुटुंब राहात असल्याचं इकबाल कासकरनं सांगितलं आहे.

दुसरीकडे दाऊदचा भाऊ इब्राहिम कासकर वार्धक्याकडे झुकला आहे. प्रकृती अत्यवस्था असल्याने तो औषधोपचार घेत आहे. तर त्याच्या इतर भावांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दाऊदचं साम्राज्य सांभळण्यासाठी एकही विश्वासू वारसदार उपलब्ध नाही. त्यामुळे अडंरवर्ल्ड डॉन नैराश्येचा गर्तेत सापडला आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: underworld don dawood ibrahim depressed over sole son becoming maulana
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV