अर्थसंकल्प 2018 : सर्व रेल्वेत सीसीटीव्ही आणि वायफाय मिळणार

रेल्वेच्या आधुनिकीकरणावर भर दिला जाणार असल्याचं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केलं.

अर्थसंकल्प 2018 : सर्व रेल्वेत सीसीटीव्ही आणि वायफाय मिळणार

नवी दिल्ली : रेल्वेसाठी अर्थसंकल्पात 1 लाख 48 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या किंमतीपेक्षाही ही रक्कम जास्त आहे. मुंबईतील लोकल रेल्वेच्या पायभूत सुविधा निर्माण करण्यासाठीही मोठी तरतूद करण्यात आली आहे.

रेल्वेच्या आधुनिकीकरणावर भर दिला जाणार असल्याचं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केलं. देशातील 600 रेल्वे स्थानकं आधुनिक बनवले जातील. मुंबईतील लोकल रेल्वेचं जाळं वाढवण्यात येणार आहे. मुंबईतील 90 किमीच्या रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण केलं जाणार आहे. तर 150 किमीचा रेल्वे मार्ग तयार करण्यात येणार आहे. यासाठी 11 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

दरम्यान, सर्व रेल्वेमध्ये वायफाय आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं. यामुळे सुरक्षेसाठी फायदा होईल.

देशातील 18 हजार किमीच्या रेल्वेमार्गाचं दुहेरीकरण करण्याचं उद्दीष्ट असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. शिवाय आगामी वर्षात 36 हजार किमीच्या नवीन रेल्वे मार्गाच्या निर्मितीचं उद्दीष्ट ठेवण्यात आलं आहे.

रेल्वे अर्थसंकल्पात मुंबईसाठी काय?

  • मुंबईतील जवळपास सर्व स्टेशनांवर सरकते जिने उभारले जाणार

  • 90 किमी मार्गाचं दुहेरीकरण

  • 150 किमीचा अतिरिक्त रेल्वे मार्ग तयार होणार

  • त्यासाठी 11 हजार कोटींची तरतूद


संबंधित बातम्या :

Budget 2018: कर रचनेत बदल नाही, प्रत्येक बिल महागणार!

#अर्थबजेटचा : अर्थसंकल्पातील आतापर्यंतचे महत्त्वाचे मुद्दे

येत्या वर्षात 70 लाख नोकऱ्या देणार : अरुण जेटली

अर्थसंकल्प 2018 : पेट्रोल, डिझेल 2 रुपयांनी स्वस्त, काय-काय महागलं?

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: union budget 2018 wifi and cctv for all local trains
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV