2022पर्यंत मुंबईत म्हाडाची 50 हजार घरं मिळणार : तावडे

2022 साली प्रत्येकाला घर ही कल्पना प्रत्यक्षात येईल आणि त्यासाठी एमएमआरडीए परिसरात 50 हजार स्वस्त घर उपलब्ध करुन दिली जातील. असा दावा शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी केला आहे.

2022पर्यंत मुंबईत म्हाडाची 50 हजार घरं मिळणार : तावडे

मुंबई : ज्यांना म्हाडाच्या लॉटरीत आता घर लागलं नाही. अशांसाठी खूशखबर आहे. कारण 2022 साली प्रत्येकाला घर ही कल्पना प्रत्यक्षात येईल आणि त्यासाठी एमएमआरडीए परिसरात 50 हजार स्वस्त घर उपलब्ध करुन दिली जातील. असा दावा शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी केला आहे. म्हाडाची सोडत विनोद तावडे यांच्या उपस्थितीत झाली. त्यावेळी ते बोलत होते.

उद्याच गोरेगावमधील ५ हजार म्हाडाच्या घरांचं टेंडर निघणार आहे. त्यामुळे ज्यांना आता घर लागणार नाही. त्यांनी नाराज होऊ नये. असंही विनोद तावडे यावेळी म्हणाले.

मुंबईतल्या म्हाडाच्या 819 घरांची सोडत आज जाहीर झाली. यात 65 हजार अर्जदारांनी आपलं नशीब आजमावलं.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Up to 50000 Mhada houses will be available in Mumbai till 2022 said vinod tawade
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV