...तरच मुंबई मॅरेथॉनला परवानगी द्या: मुंबई हायकोर्ट

21 जानेवारीला 15 वी मुंबई मॅरेथॉन होऊ घातली असताना, सोमवार 15 जानेवारीपर्यंत आयोजकांनी बीएमसीकडे ही रक्कम जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.

...तरच मुंबई मॅरेथॉनला परवानगी द्या: मुंबई हायकोर्ट

मुंबई: मुंबई मॅरेथॉनचे आयोजक प्रोकॅमला मुंबई उच्च न्यायालयानं चांगलाच दणका दिला. सोमवारपर्यंत आयोजकांनी पालिकेकडे 79 लाख रुपये भुईभाडे आणि 26 लाख रुपये अनामत रक्कम म्हणून जमा केले, तरच 21 जानेवारीला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मुंबई मॅरेथॉनला परवानगी द्या, असे स्पष्ट आदेश जारी केले आहेत.

21 जानेवारीला 15 वी मुंबई मॅरेथॉन होऊ घातली असताना, सोमवार 15 जानेवारीपर्यंत आयोजकांनी बीएमसीकडे ही रक्कम जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.

गेली 8 वर्ष आयोजक पालिकेला 26 लाख रुपये अदा करत आलेत. मग यंदा ही रक्कम अचानकपणे वाढवून 3.66 कोटी इतकी करण्यात आल्याविरोधात प्रोकॅमनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच आम्ही केवळ आठवडाभरासाठी हा कार्यक्रम करतो मग पूर्ण महिन्याभराचं भांड का भरू? असा सवालही या याचिकेतून करण्यात आला.

त्याला विरोध करत पालिकेनं हायकोर्टात स्पष्ट केलं की, मॅरेथॉनच्या माध्यमातनं आयोजकांना करोडो रूपयांचा फायदा होतो. त्यामुळे त्यांच्यासाठी ही नाममात्र रक्कम आहे. गेल्यावर्षी आयोजकांनी मंडप, स्टॉल्स आणि विशेष मार्गिका उभारण्यासाठी ठिकठिकाणी रस्त्यांवर खड्डे खणले होते. त्यावरुनही पालिका आणि आयोजकांत मोठा वाद विवाद उडाला होता.

त्यामुळे यंदा स्टॉल्स, मंडप, जाहिरातींचे फलक यासर्वांसाठी भाड आणि अनामत रक्कम आगाऊ वसुल करण्याकरता पालिकेनं  ठराव पास केलेला आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Update on marathone from HC
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV