वडापाव विक्रेत्याने वडापाव विक्रेत्यालाच जिवंत जाळलं

वडापाव विक्रेत्याने वडापाव विक्रेत्यालाच जिवंत जाळलं

उल्हासनगर : व्यावसायिक वादातून एका वडापाव विक्रेत्याने दुसऱ्या वडापाव विक्रेत्याला पेटवून दिलं. यामध्ये दुकान मालक चंदरलाल रामरखियानी 100 टक्के भाजले असून त्यांच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

रामरखियांनी यांचं उल्हासनगर रेल्वे स्टेशनजवळ जम्बो वडापावचं दुकान आहे. मात्र आजपासून त्यांच्या दुकानाबाहेर सुरेश नामक फेरीवाला वडापावचा व्यवसाय सुरु करणार होता. यावरुन चंदरलाल आणि सुरेश यांच्यात वाद झाला.

त्याच रागातून आज सकाळी 8.30 च्या सुमारास सुरेशने दुकान गाठत रामरखियानी यांच्या अंगावर बादलीभर रॉकेल टाकत त्यांना पेटवून दिलं. आजूबाजूच्या लोकांनी आग विझवत रामरखियानी यांना मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं.

दरम्यान, 49 वर्षीय चंदरलाल रामरखियानी 100 टक्के भाजले असून त्यांची मृत्यूशी झुंज सुरु आहेत. विठ्ठलवाडी पोलिस आरोपी सुरेशचा शोध घेत आहेत.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV