कॉलेजमधून घरी परतताना लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू

काल झालेल्या मुसळधार पावसानं रेल्वे वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे येईल ती लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची धडपड सुरु आहे.

कॉलेजमधून घरी परतताना लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू

विरार: वसईतील पाऊस 17 वर्षीय तरूणीच्या जीवावर बेतलाय. कॉलेजमधून घरी परतत असताना मैत्री शाहा या तरुणीचा ट्रेनमधून पडून मृत्यू झाला. काल रात्री ही दुर्घटना झाली.

खरंतर काल झालेल्या मुसळधार पावसानं रेल्वे वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे येईल ती लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची धडपड सुरू होती. त्यात या तरूणीनं लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. मात्र दुर्देवानं बोरिवली-दहीसर दरम्यान दरवाजातून  लोकलबाहेर पडली.

रात्रीची लोकल पहाटे पोहोचली

दरम्यान, चर्चगेटहून एक लोकल रात्री 10.56 वा. सुटली होती. ती पहाटे पाच वाजता विरारला पोहोचली. सुमारे सहा तास प्रवासी लोकलमध्ये अडकून होते.

मुंबई आणि उपनगरात काल पासूनच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबईसह उपनगरांना पावसाचा तडाखा बसला. रात्रीच्या सुमारासच लोकल सेवा विस्कळीत झाली होती.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV