शॉर्टकट जीवावर, वसईत रेल्वेच्या धडकेत प्रवाशाचा मृत्यू

वसई रोड आणि नालासोपारा या दोन स्टेशन्सच्या मध्यभागी सिग्नलवर रेल्वे थांबली होती, त्यावेळी प्रवाशाला शॉर्टकटचा मोह आवरला नाही

शॉर्टकट जीवावर, वसईत रेल्वेच्या धडकेत प्रवाशाचा मृत्यू

वसई : रेल्वे प्रवासात शॉर्टकट घेणं दोन प्रवाशांच्या अंगलट आलं आहे. ट्रेनच्या धडकेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. वसई रेल्वे स्थानकाजवळ हे दोन वेगवेगळे अपघात घडले.

50 वर्षीय विनोद गगड हे व्यापारी राजस्थानहून मुंबईला येत होते. वसई रोड आणि नालासोपारा या दोन स्टेशन्सच्या मध्यभागी सिग्नलवर रेल्वे थांबली होती. वसईला थांबा नसल्यामुळे सिग्नलला ट्रेन थांबली असताना ते उतरले आणि ट्रेनच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला.

रविवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. गगड हे भिवंडीतील अजंठा कंपाऊंड, धामणकर नाका परिसरातील पुष्प प्लाझा या इमारतीत राहत होते.

दुसऱ्या घटनेत प्रमोद गुप्ता हा तरुण जखमी झाला आहे. कानात हेडफोन लावून रुळावरुन जाताना प्रमोदला लोकलची धडक बसली. या दोन्ही घटनांची वसई लोहमार्ग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Vasai Rail accident : Train kills commuter who tried to take short cut latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV