विरारमधील लॉटरीतील 40 टक्के घरं 'म्हाडा'ला परत

दोन्ही लॉटरीमध्ये सुमारे 4 हजार 400 घरे म्हाडाने लॉटरीमध्ये काढली होती, यातील सुमारे 1 हजार 900 घरं म्हाडाला परत केली.

विरारमधील लॉटरीतील 40 टक्के घरं 'म्हाडा'ला परत

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाने 2014 आणि 2016 साली काढलेल्या लॉटरीतील सुमारे 40 टक्के घरं विजेत्यांनी 'म्हाडा'ला परत केली आहेत. म्हाडाच्या वाढीव किमती आणि प्रक्रियेतील दिरंगाईमुळे ग्राहकांनी आपली घरं परत केल्याची माहिती आहे.

दोन्ही लॉटरीमध्ये सुमारे 4 हजार 400 घरे म्हाडाने लॉटरीमध्ये काढली होती, यातील सुमारे 1 हजार 900 घरं म्हाडाला परत केली.

विरारच्या बोळिंज परिसरातील घरांसाठी म्हाडा कोकण मंडळाकडून 2014 आणि 2016 मध्ये लॉटरी काढण्यात आली होती. यातील ज्या विजेत्यांना घरं लागली आहेत, त्यांना अद्याप ऑफर लेटरही देण्यात आलेलं नाही. त्यामुळे ग्राहकांनी म्हाडाला ही घरं परत दिली आहेत.

2014 साली म्हाडाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यांनी घरांच्या किमती कमी केल्या होत्या. तरीही 2016 च्या लॉटरीसाठी लोकांना घरांकडे आकर्षित करण्यात म्हाडा अपयशी ठरलं होतं. खाजगी विकासकांच्या घरांच्या दरापेक्षा म्हाडाच्या लॉटरीतील घरं जास्त महाग असल्याचा दावा ग्राहकांनी केला होता.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Virar : 40 percent houses in lottery returned by winners latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV