विरारमध्ये पार्श्वनाथ जैन मंदिरावर वीज कोसळली, मूर्तींचं नुकसान

स्तंभाला चारही बाजूने असलेल्या श्री आदिनाथ, श्री अजितनाथ, श्री संभवनाथ आणि श्री अभिनंदन नाथ या दहा फुटी देवतांच्या संगमरवरी मूर्तीही तुटल्या आहेत.

विरारमध्ये पार्श्वनाथ जैन मंदिरावर वीज कोसळली, मूर्तींचं नुकसान

विरार : राज्यभर सुरु असलेल्या पावसाचा फटका विरारमधील श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराला बसला आहे. मंदिराच्या 61 फुटी मानक स्तंभावर वीज कोसळल्याने मोठं नुकसान झालं आहे.

विरार पूर्व महामार्गावरील शिरसाड गावात श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर पुण्योदय तीर्थक्षेत्र आहे. या मंदिरात मागच्याच वर्षी 61 फुटांचं मानक स्तंभ उभारलं होतं. शनिवारी रात्री विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळल्याने हा स्तंभ 50 टक्के कोसळला.

स्तंभाला चारही बाजूने असलेल्या श्री आदिनाथ, श्री अजितनाथ, श्री संभवनाथ आणि श्री अभिनंदन नाथ या दहा फुटी देवतांच्या संगमरवरी मूर्तीही तुटल्या आहेत. तसंच स्तंभाच्या संरक्षक भिंतींना तडा जाऊन त्याही कोसळल्या आहेत.

वीज कोसळली तेव्हा विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळत असल्याने, मंदिरातील सर्व कर्मचारी भोजनशाळेत होते. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV