हातात कोयता, फेरीवाल्या महिलेची अधिकाऱ्यावर दादागिरी

फेरीवाल्यांवर कारवाई करणाऱ्या पालिका आधिकाऱ्यावर कोयता उगारत या महिलेनं अर्धा किलोमीटरपर्यंत पाठलाग केला.

हातात कोयता, फेरीवाल्या महिलेची अधिकाऱ्यावर दादागिरी

विरार : विरारमध्ये एका फेरीवाल्या महिलेनं चक्क हातात कोयता घेऊन पालिका अधिकाऱ्यावर दादागिरी केली आहे. महिलेची फिल्मी स्टाईल दादागिरी मोबाईलमध्ये कैद झाली आहे.

फेरीवाल्यांवर कारवाई करणाऱ्या पालिका आधिकाऱ्यावर कोयता उगारत या महिलेनं अर्धा किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. फेरीवाला हटाव मोहिमेअंतर्गत विरारमधील कारगिल नगर परिसरात फेरीवाल्यांवर कारवाई सुरु होती. अधिकारी प्रभाकर भोईर यांनी महिलेच्या सरबताच्या गाडीवर कारवाई केली.

संतापलेल्या महिलेनं हातात कोयता घेत आपल्या मुलाच्या दुचाकीवरुन त्या पालिका अधिकाऱ्याचा पाठलाग केला. इतकंच नाही, तर पालिकेची गाडी अडवून अधिकारी भोईर यांना कोयत्याने मारण्याची धमकीही दिल्याचा आरोप आहे.

बराच वेळ भररस्त्यात हा तमाशा सुरु होता. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाहा व्हिडिओ :

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV