मुंबईत विरुष्काचं ग्लॅमरस रिसेप्शन

विरानुष्काच्या दिल्लीतील रिसेप्शन पार्टीपेक्षाही मुंबईतील रिसेप्शन आणखी जोरदार होण्याची शक्यता आहे. कारण, मुंबईतील या रिसेप्शनला टीम इंडियातील बरेच खेळाडू हजर राहणार आहेत.

मुंबईत विरुष्काचं ग्लॅमरस रिसेप्शन

मुंबई :टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूडची लीडिंग लेडी अनुष्का शर्मा या नवदाम्पत्याच्या लग्नाचं दुसरं रिसेप्शन मुंबईच्या सेंट रेजिस या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडलं. या रिसेप्शनला सुरुवात होण्याआधी विराट आणि अनुष्का ही देखणी जोडी मीडियाच्या कॅमेऱ्यांना सामोरी गेली.

विराटने जोधपुरी स्टाईलचा व्हेल्वेट सूट, तर अनुष्कानं सोनेरी वेलबुट्टीचा डिझायनर लेहंगा परिधान केला होता. पंजाबी संस्कृतीनुसार परिधान केलेला लाल चूडाही अनुष्काच्या हातात उठून दिसत होता.

विरानुष्काच्या या रिसेप्शनला क्रीडा आणि चित्रपटसृष्टीतले अनेक तारेतारका उपस्थित होते . त्या दोघांचा लग्नसोहळा ११ डिसेंबरला इटलीच्या सिएना प्रांतातल्या ब्युऑनकॉनव्हेन्टो शहरात संपन्न झाला. त्यानंतर २१ डिसेंबरला विरानुष्काच्या लग्नाचं पहिलं रिसेप्शन दिल्लीत पार पडलं होतं.

virat and anushka reception 9 jadeja

या रिसेप्शन पार्टीला टीम इंडियाचा माजी कोच अनिल कुंबळेनंही आवर्जून उपस्थिती लावली. त्यासोबतच माजी क्रिकेटर संदीप पाटील, सुनील गावसकर हे देखील उपस्थित होते. त्यांच्यासोबतच बुमरा, कुलदीप यादव, रवींद्र जाडेजा, मनीष पांडे, उमेश यादव यांनीही हजेरी लावली आहे. दुसरीकडे बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी देखील या पार्टीला हजेरी लावली आहे.

virat and anushka reception 3 anil kuble

विरुनुष्काचं हे ग्रॅण्ड रिसेप्शन मुंबईच्या 'द सेंट रेजिस' या हॉटेलमध्ये होणार आहे. हॉटेलच्या नवव्या मजल्यावरील एस्टर बॉलरुममध्ये हे रिसेप्शन पार पडलं.

hotel

'द सेंट रेजिस' हे मुंबईतील एक अलिशान हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये तब्बल 395 खोल्या, 27 सूट्स आणि 39 रेसिडेन्शल सूट्स आहे.

एकमेकांसोबत कायमस्वरुपी प्रेमाच्या बंधनात अडकण्याचं वचन आज आम्ही घेतलं. ही बातमी शेअर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे, असं कॅप्शन दोघांनीही दिलं.

दरम्यान, विराट आणि अनुष्काचं लग्न हा या वर्षातील सर्वात चर्चेचा विषय होता. पण 11 डिसेंबरला काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीतच विरानुष्काचा लग्न सोहळा इटलीमध्ये पार पडला होता.

लोअर परेलमध्ये जंगी पार्टी
लोअर परेलमधील हॉटेल St Regis मध्ये बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. यात शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, करण जोहर, कतरिना कैफ, राणी मुखर्जीसह इतर सेलिब्रिटी सहभागी होतील.

हॉटेलच्या गच्चीवर पार्टी
हॉटेलच्या गच्चीवर ही पार्टी आयोजित केली आहे. या पार्टीत 300 पेक्षा जास्त पाहुणे येण्याची शक्यता आहे. हॉटेलची सजावट फूल, लाईट आणि मेणबत्त्यांनी केली आहे. रात्री 8 वाजता विरुष्काच्या पार्टीला सुरुवात होईल. वाहतूक कोंडीपासून वाचण्यासाठी सेलेब्रिटींना वेळेआधीच पोहोचण्याची विनंती करण्यात आली आहे.

क्रिकेटसह उद्योग विश्वातील दिग्गजांची हजेरी
क्रिकेट विश्वातूनही अनेक दिग्गज रिसेप्शनला हजेरी लावणार आहे. दिल्लीतील रिसेप्शनमध्ये जे आले नव्हते, ते मुंबईत उपस्थिती लावतील. यात सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंहसह अनेक क्रिकेटरचा समावेश आहे. याशिवाय रिलायन्सचे मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्यासह अनेक बिझनेस टायकूनही विरुष्काला शुभेच्छा देण्यासाठी येतील.

दिल्लीच्या रिसेप्शनला पंतप्रधानांची हजेरी
विराट आणि अनुष्काचं दिल्लीचं रिसेप्शन विशेषत: विराटच्या नातेवाईकांसाठी होतं. कारण विराटचं कुटुंब दिल्लीत राहतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हजेरी लावल्याने या सोहळ्याला चारचाँद लागले होते. याशिवाय रिसेप्शनमध्ये सुरेश रैना, गौतम गंभीर आणि शिखर धवननेही हजेरी लावली होती.

संबंधित बातम्या :

अनुष्का शर्माने केलेलं ट्विट ठरलं यंदाचं गोल्डन ट्विट

मुंबईत आज 'विरुष्का'चं ग्रॅण्ड रिसेप्शन, 300 पाहुणे हजेरी लावणार!

 

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: virat kohli anushka sharma mumbai reception latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV