शिवसेनेकडून विश्वनाथ महाडेश्वरांचा महापौरपदासाठी अर्ज दाखल

शिवसेनेकडून विश्वनाथ महाडेश्वरांचा महापौरपदासाठी अर्ज दाखल

मुंबई: मुंबईत महापौर आणि उपमहापौरपदासाठी शिवसेनेने आपले उमेदवार निश्चित केले आहेत. महापौरपदासाठी विश्वानाथ महाडेश्वर आणि उपमहापौरपदासाठी हेमांगी वरळीकर यांची नावं निश्चित झाली आहेत.

‘मातोश्री’वर झालेल्या नेत्यांच्या बैठकीत महाडेश्वर आणि वरळीकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर विश्वनाथ महाडेश्वर आणि हेमांगी वरळीकर यांनी अनुक्रमे महापौर आणि उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला.

विश्वनाथ महाडेश्वर यांची आतापर्यंतची राजकीय कारकीर्द:

शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर हे आतापर्यंत महापालिकेत तिसऱ्यांदा निवडून गेले आहेत. पहिल्या टर्ममध्ये ते शिक्षण समितीचे चेअरमन होते. तर नंतर पाच वर्ष ते स्थायी समितीत होते. तर 2012 साली त्यांच्या पत्नी पूजा महाडेश्वर या निवडून आल्या होत्या. या निवडणुकीत महाडेश्वर यांनी वांद्रे पूर्व येथील वॉर्ड क्रमांक 87 मधून त्यांनी भाजपच्या महेश पारकर आणि काँग्रेसच्या धर्मेश व्यास यांचा पराभव केला. राजे संभाजी विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजचे ते प्राचार्यही होते.

हेमांगी वरळीकर यांची आतापर्यंतची राजकीय कारकीर्द:

हेमांगी वरळीकर यांची नगरसेवक पदाची ही दुसरी टर्म  आहे. याआधी त्यांनी शिक्षण समितीचं महापौरपद भूषवलं होतं. वॉर्ड क्रमांक 193 मधून त्या यंदा निवडून आल्या आहेत.हेमांगी वरळीकर यांनी यावेळी भाजपच्या जयंत नटे आणि काँग्रेसच्या अतित मयेकर यांचा पराभव केला.

दरम्यान, मुंबई महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक भाजप लढवणार नसल्याने शिवसेनेचा महापौर आणि उपमहौर होणार, हे निश्चित झालं आहे.

First Published: Saturday, 4 March 2017 1:14 PM

Related Stories

GVK विरोधात गुन्हा नोंदवू शकत नाही, मनसेला पोलिसांचं उत्तर
GVK विरोधात गुन्हा नोंदवू शकत नाही, मनसेला पोलिसांचं उत्तर

मुंबई : मुंबई विमानतळावर एन्ट्री फीच्या नावे सुरु असणारी लूट कायम

 राणे विरुद्ध परब, विधानपरिषदेत जुगलबंदी
राणे विरुद्ध परब, विधानपरिषदेत जुगलबंदी

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे आणि शिवसेनेचे आमदार

कॉकपीटमधून धूर निघाल्यानं एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग!
कॉकपीटमधून धूर निघाल्यानं एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी...

मुंबई : मुंबई विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग

जयंत पाटलांना सत्तेत येण्याची घाई: मुनगंटीवार
जयंत पाटलांना सत्तेत येण्याची घाई: मुनगंटीवार

मुंबई: जीएसटी विधेयकासाठी बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनाच्या

महाराष्ट्र विधानसभेत GST विधेयक एकमताने मंजूर
महाराष्ट्र विधानसभेत GST विधेयक एकमताने मंजूर

मुंबई : महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विधेयक अर्थात जीएसटी विधानसभेत

हायटेक तेजसच्या प्रवासासाठी 780 ते 2740 रुपये तिकीट
हायटेक तेजसच्या प्रवासासाठी 780 ते 2740 रुपये तिकीट

मुंबई : कोकण आणि गोवावासियांसाठी पर्वणी ठरणारी तेजस एक्स्प्रेस

केवळ साडे 8 तासात मुंबई-गोवा... हायटेक ‘तेजस’ सज्ज!
केवळ साडे 8 तासात मुंबई-गोवा... हायटेक ‘तेजस’ सज्ज!

मुंबई: मुंबई ते गोवा धावणारी ‘तेजस’ आजपासून (सोमवार) मुंबईतून

तुफान डायलॉगबाजी, सभागृहात हास्यकल्लोळ, जयंत पाटलांचं भाषण जसंच्या तसं
तुफान डायलॉगबाजी, सभागृहात हास्यकल्लोळ, जयंत पाटलांचं भाषण...

मुंबई : कटप्पानं बाहुबलीला का मारलं, याचं उत्तर सगळ्यांनाच मिळालं

भिवंडीत कारमध्ये स्फोटकांचा मोठा साठा जप्त, तिघांना अटक
भिवंडीत कारमध्ये स्फोटकांचा मोठा साठा जप्त, तिघांना अटक

भिवंडी : भिवंडीजवळच्या अंबाडी नाका भागातून मोठ्या प्रमाणात

'तेजस'वर समाजकंटकांची वक्रदृष्टी, काचा फोडल्या
'तेजस'वर समाजकंटकांची वक्रदृष्टी, काचा फोडल्या

मुंबई : भारतीय रेल्वेचा वेग वाढवणारी सुपरफास्ट हायटेक ट्रेन तेजस