शिवसेना लोकसभा, विधानसभा स्वबळावर लढणार!

2019 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढणार आहे.

शिवसेना लोकसभा, विधानसभा स्वबळावर लढणार!

मुंबई: शिवसेना आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार आहे. इतकंच नाही तर यापुढे देशातील प्रत्येक राज्यातील निवडणूक लढण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढेल, असा ठराव खासदार संजय राऊत यांनी मांडला. त्याला एकमताने संमती मिळाली.

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला.

2019 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढेल, असा ठराव मी मांडतो, असं संजय राऊत म्हणाले. त्याला उपस्थितांनी हात वर करुन मंजुरी दिली.

या बैठकीत शिवसेनेच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यंदा नेतेपदी पाच नव्या चेहऱ्यांची वर्णी लागली. यामध्ये आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे यांचा समावेश आहे.

शिवसेनेचे एकूण १३ नेते असतील

 • मनोहर जोशी

 • सुधीर जोशी

 • लीलाधर ढाके

 • दिवाकर रावते

 • संजय राऊत

 • रामदास कदम

 • गजानन कीर्तीकर

 • सुभाष देसाई


नविन नियुक्ती

 • आदित्य ठाकरे

 • एकनाथ शिंदे

 • चंद्रकांत खैरे

 • आनंदराव अडसूळ

 • अनंत गीते


शिवसेना सचिव- मिलींद नार्वेकर, सूरज चव्हाण.

प्रवक्ते- अरविंद सावंत, निलम गोऱ्हे, मनिषा कायंदे, अमोल कोल्हे, अनिल परब

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: We will fight 2019 Assembly and Lok Sabha elections alone: Sanjay Raut, Shiv Sena
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV