दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना रेशन दुकानातून आता साखर मिळणार नाही

अंत्योदय योजनेतील गरीब कुटुंबांना रेशनवर मिळणाऱ्या साखरेचे दर वाढवले आहेत.

दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना रेशन दुकानातून आता साखर मिळणार नाही

मुंबई : दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना रेशन दुकानांवर साखर मिळणार नाही. राज्यातील 45 लाख कुटुंबांना या निर्णयाचा फटका बसणार आहे.

दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना पूर्वीप्रमाणे साखर देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवला होता. मात्र केंद्र सरकारने हा प्रस्ताव फेटाळून लावला.

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेतील लेखी उत्तरात यासंदर्भात माहिती दिली.

दुसरीकडे अंत्योदय योजनेतील गरीब कुटुंबांना रेशनवर मिळणाऱ्या साखरेचे दर वाढवले आहेत. त्यामुळे अंत्योदय योजनेतील कुटुंबांना रेशनवर एक किलो साखर 20 रुपयांना मिळणार आहे. पूर्वी एक किलो साखर 15 रुपयांना मिळत होती.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Will not get sugar from rationing shop to BPL
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV