जिद्द आणि मेहनत... मुंबईच्या तरुणाला थेट इस्रोत नोकरी!

प्रखर इच्छाशक्ती आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर जगात काहीच अश्यक्य नाही, याचंच उदाहरण म्हणजे मुंबईच्या पवई भागातील फिल्टरपाडा झोपडपट्टीत राहणारा प्रथमेश हिरवे.

जिद्द आणि मेहनत... मुंबईच्या तरुणाला थेट इस्रोत नोकरी!

मुंबई : प्रखर इच्छाशक्ती आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर जगात काहीच अश्यक्य नाही, याचंच उदाहरण म्हणजे मुंबईच्या पवई भागातील फिल्टरपाडा झोपडपट्टीत राहणारा प्रथमेश हिरवे. या तरुणाने दहा बाय दहाच्या खोलीत रात्रंदिवस अभ्यास करुन थेट इस्रोमध्ये वैज्ञानिक म्हणून नोकरी मिळवली आहे

प्रथमेशने पहिले ते दहावीपर्यंतचं शिक्षण अगदी साध्या मराठी माध्यमाच्या शाळेत केलं. त्यांनतर कॉलेजमध्ये प्रवेशाची वेळ आली त्यावेळी त्याने आपली आप्टिट्यूड टेस्ट दिली आणि त्यात त्याला कला शाखेत प्रवेश घेण्याचं मार्गदर्शन तज्ज्ञांकडून देण्यात आलं. मात्र, आपल्याला इंजिनिअरींग करायचं असा प्रथमेशनं आपल्या आई-वडिलांना सांगितलं.

आपली जिद्द कायम ठेवत प्रथमेशनं इंजिनिअरींगचं शिक्षणही पूर्ण केलं. त्यानंतर त्याने टाटा, एल अँड टी या सारख्या नामांकित कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून कामही केलं.पण त्यावर समाधान न मानता लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसोबत इस्रोच्या प्रवेश परीक्षेचा अभ्यासही प्रथमेशने सुरु ठेवला.
मे महिन्यात जेंव्हा 16000 विद्यार्थ्यांमधून प्रथमेशची निवड इस्रोमध्ये झाली तेव्हा त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. जे स्वप्न प्रथमेशनं पाहिलं होतं ते त्यानं सत्यात आणलं होतं. प्रथमेश हा मुंबईतून पहिला वैज्ञानिक आहे जो इस्रोमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअर म्हणून रुजू होणार आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: With hard work the Mumbai boy directly employed in ISRO
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV