नव्या वाशी खाडी पुलावर 20 दिवस दुरुस्तीचं काम, एक मार्ग बंद

वाशीहून मुंबईला जाणाऱ्या मार्गीकेवर असलेल्या जॉईंडरचं काम करण्यात येणार आहे.

नव्या वाशी खाडी पुलावर 20 दिवस दुरुस्तीचं काम, एक मार्ग बंद

नवी मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नव्या वाशी खाडी पुलावर दुरूस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे. 23 जानेवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यान हे काम चालणार आहे. त्यामुळे वाहतुकीत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

वाशीहून मुंबईला जाणाऱ्या मार्गीकेवर असलेल्या जॉईंडरचं काम करण्यात येणार आहे. नव्या वाशी खाडी पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने लोखंडी जॉईंडरची झीज झाली आहे. त्यामुळे हे काम हाती घेतलं आहे.

वाहतुकीत करण्यात आलेले बदल

  • मुंबईला जाणाऱ्या मार्गिकेवर दुरुस्तीचं काम घेतल्याने हा मार्ग बंद राहिल

  • मुंबईला जाणारी वाहतूक उलट्या मार्गिकेवरून मुंबईला जाईल

  • मुंबईहून नवी मुंबईला जाणाऱ्या हलक्या वाहनांना जुन्या खाडी पुलाचा वापर करता येईल.

  • जुन्या खाडी पुलावरून जाण्यास जड वाहनांना बंदी असल्याने मुंबईबाहेर जाणारी जड वाहतूक ऐरोली पुलावरून वळवण्यात येणार आहे.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: work will progress on new Vashi creek bridge changes in route
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: vashi Creek bridge वाशी पूल
First Published:

Related Stories

LiveTV