पाच आठवड्यात इमाननं 142 किलो वजन घटवलं

पाच आठवड्यात इमाननं 142 किलो वजन घटवलं

मुंबई : जगातील सर्वात लठ्ठ महिला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इजिप्तच्या इमान अहमदने पाच आठवड्यात तब्बल 142 किलो वजन घटवलंय. इमानचे सध्या वजन 500 किलोवरुन 358 किलोवर पोहोचलं आहे.

इमानवर डॉक्टर मुफ्फजल लकडावाला यांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. जेव्हा तिचं भारतात आगमन झालं, त्यावेळी तिचं वजन तब्बल 500 किलो होतं. पण डॉक्टर लकडावाला यांच्या मार्गदर्शनाखाली तिने तब्बल 142 किलो वजन घटवलं आहे.

इमानवरील पहिल्या टप्प्यातील उपचार पूर्ण झाल्यानंतर ती इजिप्तला परतणार आहे. इजिप्तला गेल्यानंतरही तिच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती डॉ. मुफ्फजल लकडावाला यांनी दिली.

इमानवर 7 मार्च रोजी वजन कमी करण्यासाठी बेरिएट्रिक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पण या शस्त्रक्रियेपूर्वीत तिनं डाएट आणि औषधोपचारामुळे अवघ्या महिनाभरातच 100 किलो वजन घटवलं होतं. आता पुन्हा डाएट आणि औषोधोपचाराद्वारे एकूण 142 किलो वजन घटवलं आहे.

संबंधित बातम्या

इमानवर यशस्वी शस्त्रक्रिया, पहिला फोटो समोर

शस्त्रक्रियेसाठी मुंबईत आलेल्या लठ्ठ महिलेला क्रेनने उचललं

जगातल्या सर्वात लठ्ठ महिलेचे वजन...

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV