झेरॉक्स मशिन जपून वापरा, मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना तंबी

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागानं याबाबतचं परिपत्रक काढलंय.

झेरॉक्स मशिन जपून वापरा, मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना तंबी

मुंबई: मंत्र्यांच्या कार्यालयातील झेरॉक्स मशिन वारंवार बंद पडत असल्याने त्यांचा दुरुस्तीचा खर्च आता कर्मचाऱ्यांच्याच पगारातून वसूल करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. झेरॉक्स मशिनचा व्यवस्थित वापर होत नसल्याने दुरुस्ती करावी लागत असल्याचं समोर आलं. त्यानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला.

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचं परिपत्रक काढलंय. मंत्र्यांच्या कार्यालयातील झेरॉक्स मशिन या अत्याधुनिक आणि महागड्या आहेत. या मशिन्स वारंवार बंद पडत असल्याबाबतच्या तक्रारी मंत्र्यांच्या कार्यालयांकडून सातत्याने येत होत्या.

त्या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागाने हा निर्णय घेतलाय. त्यामुळं या झेरॉक्स मशिन्स वापरताना आता कर्मचाऱ्यांना चांगलीच काळजी घ्यावी लागणार आहे.

झेरॉक्स मशिन व्यवस्थित ठिकाणी ठेवणे, मशिनच्या आसपास रिकामी वेष्टने, ग्लास, खाद्यपदार्थ ठेवू नये कारण त्यामुळे झेरॉक्स मशिनच्या आसपास उंदीर, झुरळांचा वावर वाढतो. ट्रे उघडे ठेवू नये, झेरॉक्स प्रती काढल्यावर त्याच ठिकाणी स्टेपल करु नये, अशी काळजी घेण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.

मुंबई शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: xerox machine repair charges cuts from govt employee
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
अधिक माहिती: mantralaya xerox झेरॉक्स मशिन
First Published:

Related Stories

LiveTV