झेडपीत भाजपला रोखणार, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र!

झेडपीत भाजपला रोखणार, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र!

मुंबई: मुंबईसह दहा महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक झाल्यानंतर,आता जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. 

अध्यक्षपदाच्या निवडणुकांच्या निमित्ताने एक नवं राजकीय समीकरण समोर येत आहे. भाजपला रोखण्यासाठी  जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडीसाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार आहे.

जिल्हा पातळीवर भाजप वगळता शक्य त्या पक्षाचा जिल्हा परिषद अध्यक्ष बसवण्यासाठी हालचालींना वेग आला आहे.

शिवसेना नेते आणि संपर्कप्रमुखांना जिल्हा परिषद अध्यक्ष बसवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चा करण्याचे आदेश पक्षाने दिले आहेत.

मात्र मुंबई महापालिकेत भाजपने शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी बिनशर्त पाठिंबा दिल्याने परतफेड म्हणून पुणे आणि पिंपरी – चिंचवड महापालिकेत शिवसेना भाजपला पाठिंबा देणार आहे.

पुण्यात भाजपला 98 आणि शिवसेनेला 10 जागा मिळाल्या आहेत. तर राष्ट्रवादीला 38 जागांवर समाधान मानावं लागलं.

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने तब्बल 77 जागी यश मिळवलं. तर शिवसेना 9 आणि सत्ताधीर राष्ट्रवादीला 36 जागा मिळाल्या आहेत.

First Published: Monday, 13 March 2017 2:17 PM

Related Stories

खडसेंनी फडणवीस सरकारला झाप झाप झापलं!
खडसेंनी फडणवीस सरकारला झाप झाप झापलं!

मुंबई: भाजप नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी फडणवीस

तुकाराम मुंढेंनी पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला
तुकाराम मुंढेंनी पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला

पुणे: आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अखेर पुणे महानगर परिवहन

... तर पुन्हा रामलीलावर आंदोलन, अण्णा हजारेंचा इशारा
... तर पुन्हा रामलीलावर आंदोलन, अण्णा हजारेंचा इशारा

अहमदनगर : लोकपाल आणि लोकायुक्त नेमण्याची सरकारची इच्छा नाही, असं

ना विमान, ना रेल्वे, आता रस्ते मार्गे खा. गायकवाड दिल्लीकडे
ना विमान, ना रेल्वे, आता रस्ते मार्गे खा. गायकवाड दिल्लीकडे

मुंबई:  शिवसेनेचे चप्पलमार खासदार रवींद्र गायकवाड आता रस्तेमार्गे

बारावीचे पेपर तपासण्यावर बहिष्कार, 750 शाळांना कारणे दाखवा नोटीस
बारावीचे पेपर तपासण्यावर बहिष्कार, 750 शाळांना कारणे दाखवा नोटीस

औरंगाबाद : बारावीचे पेपर तपासण्यावर बहिष्कार टाकल्याने

राष्ट्रपतीपदासाठी माझ्या नावाची चर्चा केवळ मनोरंजन समजा : भागवत
राष्ट्रपतीपदासाठी माझ्या नावाची चर्चा केवळ मनोरंजन समजा : भागवत

नागपूर : “राष्ट्रपतीपदासाठी माझ्या नावाची चर्चा केवळ

मराठा आरक्षणाच्या प्रस्तावावरुन हायकोर्टात मत-मतांतर
मराठा आरक्षणाच्या प्रस्तावावरुन हायकोर्टात मत-मतांतर

मुंबई: मराठा आरक्षणाचा मुद्दा मागासप्रवर्ग आयोगाकडे पाठवायचा की

नागपूरमधील शासकीय बालसुधार गृहातून 14 मुलांचं पलायन
नागपूरमधील शासकीय बालसुधार गृहातून 14 मुलांचं पलायन

नागपूर: नागपूरच्या बालसुधार गृहातून तब्बल 14 मुले पळून गेल्याची

उष्माघाताचा बीडमध्ये पहिला बळी
उष्माघाताचा बीडमध्ये पहिला बळी

बीड : राज्यातील तापमानाचा पारा वाढतच चालला आहे. बीडमध्ये या

एसी बसमधून संघर्षयात्रा, विरोधी पक्ष चंद्रपुरात दाखल
एसी बसमधून संघर्षयात्रा, विरोधी पक्ष चंद्रपुरात दाखल

चंद्रपूर : संघर्षयात्रेत बडेजाव टाळा असे आदेश विरोधी पक्षांनी दिले