हेक्टरी 50 लाख रुपयांचा भाव, समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनाचे दर जाहीर

50 lakh per hectre land acquisition rates declared for samrudhhi mahamarg

प्रातिनिधीक फोटो

नाशिक : समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनासाठी सरकारने दर जाहीर केले आहेत. जीरायती जमिनीला सरासरी हेक्टरी 50 लाख रुपये दर मिळणार आहे. किमान 40 लाख रुपये ते 85 लाख रुपये हेक्टरी भाव असेल, अशी माहिती जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी दिली आहे. हे दर एकरी असल्याचं अगोदर बोललं जात होतं, मात्र एकरी नव्हे तर हेक्टरी म्हणजे अडीच एकरसाठी 50 लाख रुपये भाव देण्यात आला आहे.

समृद्धी महामार्गाला विरोध करणाऱ्यांना चॅप्टर नोटीस

आदिवासी शेतकऱ्यांना बागायतीसाठी दीड पट दर दिले जातील. तर फळझाडे मालमत्तेला दुप्पट रक्कम मोबदला मिळणार आहे. शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचं आवाहन बी. राधाकृष्णन यांनी केलं आहे.

VIDEO:  स्पेशल रिपोर्ट: मुंबई- नागपूर हायवेचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट   

सरकारच्या या निर्णयामुळे 48 गावातील शेतकरी लखपती होणार आहेत. इगतपुरीतील पिंपरी सदो आणि सिन्नरमधील सावता माळी नगर पांढूरलीला सर्वाधिक 80 लाखापर्यंतचा भाव देण्यात येणार आहे.

समृद्धी महामार्ग मोजणीला हिंसक वळण

जमिनीची खरेदी करताच दोन दिवसात रक्कम आरटीजीएसद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

शेतकऱ्यांचा विरोध कायम

दर जाहीर केल्यानंतरही शिवडे गावातील अनेक शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध मात्र कायम आहे. आम्हाला 2 कोटी रुपये एकरी दिले तरी आम्ही जमीन सोडणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सध्या सरकारकडून सुरु आहेत.

काय आहे प्रकरण?

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांचा विरोध डावलून मोजणी सुरु केल्याने रोष व्यक्त केला जात आहे. मुंबई-नागपूर हा समृद्धी महामार्ग राज्य सरकारचा महत्त्वाकांशी प्रकल्प आहे. या महामार्गासाठी सरकारने भूमीसंपादन करण्यास सुरुवात केली आहे. पण कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय हे संपादन होत असल्याचा दावा प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.

  • जमीन
    एकूण वन जमीन 399 हेक्टर
    एकूण शेत जमीन 17499 हेक्टर
    पडीक जमीन 2922 हेक्टर
    एकूण जमीन 20820 हेक्टर
  • खर्च 
    बांधकाम 24 हजार कोटी
    आर्थिक अधिभार 6 हजार कोटी
    भूसंपादन 13 हजार कोटी
    इतर 3 हजार कोटी
    एकूण खर्च 46 हजार कोटी

Maharashtra News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:50 lakh per hectre land acquisition rates declared for samrudhhi mahamarg
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

तुमच्यासाठी आयुष्य ओवाळून टाकेन, उदयनराजे रामोशी समाजाच्या मोर्चात
तुमच्यासाठी आयुष्य ओवाळून टाकेन, उदयनराजे रामोशी समाजाच्या...

सातारा : रामोशी समाजाच्या विविध मागण्यांसाठी साताऱ्यात निघालेल्या

पेपर तपासणीसाठी पुणे, कोल्हापूर विद्यापीठ मुंबई विद्यापीठाच्या मदतीला
पेपर तपासणीसाठी पुणे, कोल्हापूर विद्यापीठ मुंबई विद्यापीठाच्या...

मुंबई : मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल जाहीर होण्याबाबत

नगरमध्ये शेतकऱ्यांचा ‘एल्गार’, संपूर्ण कर्जमाफीची मागणी
नगरमध्ये शेतकऱ्यांचा ‘एल्गार’, संपूर्ण कर्जमाफीची मागणी

शिर्डी : संपूर्ण कर्जमाफी मिळावी आणि सातबारा कोरा व्हावा, या

फोनवर बँकेची माहिती देणं महागात, जालन्यातील शिक्षिकेला लाखोंचा गंडा
फोनवर बँकेची माहिती देणं महागात, जालन्यातील शिक्षिकेला लाखोंचा...

जालना : आपल्या बँक खात्याची गोपनीय माहिती अनोळखी फोनवर देणं किती

200 कर्मचाऱ्यांचं निलंबन नाही, सरकार लाचखोरांच्या पाठीशी?
200 कर्मचाऱ्यांचं निलंबन नाही, सरकार लाचखोरांच्या पाठीशी?

औरंगाबाद : हे सरकार लाचखोर अधिकाऱ्यांच्या पाठीशी आहे का? हा प्रश्न

पीकविमा भरण्याची मुदत सरकार वाढवणार का?
पीकविमा भरण्याची मुदत सरकार वाढवणार का?

मुंबई : आजपासून 31 जुलैपर्यंत बँकामधून पीक विमा ऑनलाईन भरता येणार

राजीव गांधींच्या बोफोर्स प्रकरणाचा नववीच्या पुस्तकात उल्लेख
राजीव गांधींच्या बोफोर्स प्रकरणाचा नववीच्या पुस्तकात उल्लेख

नागपूर: महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम

अहमदनगरमध्ये चोरट्यांनी थेट ATM मशीनच पळवलं!
अहमदनगरमध्ये चोरट्यांनी थेट ATM मशीनच पळवलं!

अहमदनगर : अहमदनगरला चोरट्यांनी चक्क एटीएमचं मशीनच लांबवलं आहे.

कोल्हा'पुरात' अडकलेल्या तीन माकडांची 15 दिवसांनी थरारक सुटका
कोल्हा'पुरात' अडकलेल्या तीन माकडांची 15 दिवसांनी थरारक सुटका

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये पुरात अडकलेल्या माकडांची तब्बल 15

लग्नानंतर प्रियकराशी संबंध ठेवण्याचा हट्ट, बापाने मुलीचा गळा आवळला!
लग्नानंतर प्रियकराशी संबंध ठेवण्याचा हट्ट, बापाने मुलीचा गळा...

जळगाव : लग्न झाल्यानंतरही गावातील प्रियकराशी प्रेम संबध ठेवण्याचा