महिलांचा गाऊन घालून अश्लिल चाळे करणाऱ्या विकृताची नाशकात दहशत

गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या सिडको परिसरात एका तरुणाची प्रचंड दहशत बघायला मिळत आहे. पहाटेच्या वेळी परिसरातून फिरणाऱ्या या तरुणामुळे महिलांना घराबाहेर पडणदेखील मुश्किल झालं आहे. विशेष म्हणजे, या परिसरात हाकेच्या अंतरावरच पोलीस स्थानक असूनही, पोलिसांना या माथेफिरुला जेरबंद करण्यात अपयश येत आहे.

महिलांचा गाऊन घालून अश्लिल चाळे करणाऱ्या विकृताची नाशकात दहशत


नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या सिडको परिसरात एका तरुणाची प्रचंड दहशत बघायला मिळत आहे. पहाटेच्या वेळी परिसरातून फिरणाऱ्या या तरुणामुळे महिलांना घराबाहेर पडणदेखील मुश्किल झालं आहे. विशेष म्हणजे, या परिसरात हाकेच्या अंतरावरच पोलीस स्थानक असूनही, पोलिसांना या माथेफिरुला जेरबंद करण्यात अपयश येत आहे.


सिडकोच्या राणेनगरमध्ये पहाटेच्या वेळी नळाला पाणी येत असल्याने पाणी भरण्यासाठी महिला घराबाहेर पडतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून एक तरुण महिलांचे गाऊन परिधान करून या ठिकाणी वावरत आहे. हा तरुण अश्लील हावभाव करत महिलांची छेड काढण्याचा प्रयत्न करतो आणि महिलांनी आरडाओरड करायला सुरुवात करताच तो इथून पळ काढतो, अशी इथल्या महिलांची तक्रार आहे.


मागील 15 दिवसांपासून हा प्रकार महिलांना सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, हाकेच्या अंतरावरच अंबड पोलीस स्टेशन असून, देखील असे प्रकार होत असल्याने आश्चर्य व्यक्त केल जात आहे.


गुरुवारी पहाटे देखील 5 वाजेच्या सुमारास हा तरुण या परिसरात पुन्हा आला होता. मात्र येथील नागरिकांनी त्याचा पाठलाग केला असता तो फरार झाला. ही सर्व घटना एका दुकानाबाहेरील असलेल्या सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे.


दरम्यान, बायकांचे कपडे घालून ही असली थेरं करणाऱ्याने, आतापर्यंत तरी कुणाला हानी पोहोचवलेली नाही. पण असला काही प्रमाद होण्याआधीच त्याला तातडीने जेरबंद करण्याची गरज आहे.

नाशिक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV