हाताला सहा बोटं असल्यानं आधार कार्ड मिळेना, तरुणाची ससेहोलपट

सहावे बोट असल्यानं तांत्रिक अडचणी येत असल्याचे सांगत गुरुदयालला आधारकार्ड नाकारलं जात आहे.

हाताला सहा बोटं असल्यानं आधार कार्ड मिळेना, तरुणाची ससेहोलपट

नाशिक : हाताला सहा बोटं असणं काही गुन्हा नाही, कुणाला किती बोटं असावीत हे कुणाच्या हातातही नाही. चित्रपट अभिनेता हृतिक रोशनसह बऱ्याच जणांच्या हाताला सहा बोटं आहेत. मात्र याच सहा बोटांमुळे नाशिकमधला एक तरुण हवालदील झाला आहे.

aadhar card nashik 1

कारण अनेक खेटे मारुनही त्याला आधार कार्ड मिळत नाही. गुरुदयाल त्रिखा असं या नाशिकच्या तरुणांचं नाव आहे. गुरुच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला जोडबोट आहे. मात्र आधार कार्ड काढताना केवळ पाच बोटांचेच ठसे घेतले जातात.

सहावे बोट असल्यानं तांत्रिक अडचणी येत असल्याचे सांगत गुरुदयालला आधारकार्ड नाकारलं जात आहे. काही लोकांनी त्याला अंपगाच्या कोट्यातून आधारकार्ड काढण्याचा सल्ला दिला. मात्र, तो अंपग नसल्यानं या तरुणाला अपंगत्वाचंही प्रमाणपत्र मिळत नाही. त्यामुळे या तरुणाची अडचण झाली आहे.

VIDEO :

नाशिक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Aadhar cards were rejected due to six fingers in the hand of a youth in Nashik latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV