एटीएम... एनी टाईम मिल्क, नाशिकमध्ये मशिनचं लोकार्पण

शेतकरी ते ग्राहक यांच्यात दलाल मोठा नफा कमावतात. मात्र हे चित्र बदलण्याचं मोठं काम हे एटीएम करणार आहे.

एटीएम... एनी टाईम मिल्क, नाशिकमध्ये मशिनचं लोकार्पण

नाशिक : आजपर्यंत तुम्ही पैसे काढण्याचे एटीएम पाहिले असाल, मात्र नाशिकमध्ये आता एटीएम नाव वेगळ्याच कारणास्तव चर्चेत येते आहे. ते म्हणजे ऑटोमिक टेलर मशिन नव्हे, तर एनी टाईम मिल्क (ATM).

महाराष्ट्रातील या पहिल्या दुधाच्या एटीएमचे उद्घाटन नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत झाले. पालकमंत्री गिरीश महाजन आणि लोकप्रतिनिधींच्या हस्ते या एटीएमचं लोकार्पण झालं. सिन्नर दूध उत्पादन संघाच्या वतीनं कॉलेज रोडवरील बॉईज टाऊन स्कूलसमोर हे एटीएम सुरु करण्यात आले आहे.

Milk ATM

देशातील पहिले वातानुकूलित दुधाचं मशीन असून, ग्राहकांना चोवीस तास आणि उच्च प्रतीचे निर्भेळ दूध मिळावे आणि शेतकऱ्यांना देखील दोन पैशांचा फायदा व्हावा, या उद्देशाने ही संकल्पना राबविण्यात येत आहे.

शेतकरी ते ग्राहक यांच्यात दलाल मोठा नफा कमावतात. मात्र हे चित्र बदलण्याचं मोठं काम हे एटीएम करणार आहे.

विशेष म्हणजे, या मशीनमधून गाय, म्हैस यासोबतच साहिवाल या दुर्मिळ गाईचं देखील दूध नाशिककरांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

नाशिक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Any Time Milk machine launched in Nashik
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV