‘भाजप सरकार हिंदूंना एकत्र करुन अल्पसंख्याकांमध्ये फूट पाडत आहे’

पूर्वीचं सरकार हिंदूंमध्ये फूट पाडून अल्पसंख्याकांचं संघटन करायची. मात्र, भाजप सरकार हिंदूंना एकत्र करुन अल्पलसंख्यांकांमध्ये फूट पाडत असल्याचं धक्कादायक विधान भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे.

BJP leader Subrmanyam Swamis controversial statement on minority communities

नाशिक : पूर्वीचं सरकार हिंदूंमध्ये फूट पाडून अल्पसंख्याकांचं संघटन करायची. मात्र, भाजप सरकार हिंदूंना एकत्र करुन अल्प संख्यांकांमध्ये फूट पाडत असल्याचा आरोप भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे. नाशिकमध्ये हिंदुस्थान प्रकाशन संस्थेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी स्वामींनी काँग्रेस आणि नेहरु यांच्यावरही जहरी टीका केली. नेहरु-गांधी घराण्यातील कुणाकडेही खरी डिग्री नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली. पण, अल्पसंख्याकांमधील फुटीवरुन त्यांनी केलेल्या विधानाबाबत आश्चर्य व्यक्त होतं आहे.

तिहेरी तलाकच्या मुद्द्यावरुन सब्रह्मण्यम स्वामी म्हणाले की, “मोदी सरकारने तिहेरी तलाक रद्द करण्याचा प्रयत्न केल्याने, उत्तर प्रदेशात मुस्लीम महिलांनी भाजपला भरभरुन मतदान केलं. मुस्लीम बहुल मतदार संघातील 125 पैकी 85 जागा भाजपला मिळाल्या. आम्ही हिंदूंना संघटीत करुन, अल्पसंख्यांकांमध्ये विभाजन करतो. पूर्वीचे सरकार हिंदूत फूट पाडायचे आणि अल्पसंख्याकांना संघटीत केलं जात होतं.”

काँग्रेस आणि नेहरुवर जहरी टीका करताना स्वामी म्हणाले की, “नेहरु घराण्यातल्या एकानेही आजपर्यंत पास होऊन डिग्री घेतलेली नाही. सोनिया गांधींनी केम्ब्रिजमधून डिग्री घेतल्याची खोटी माहिती दिली होती. पण नंतर प्रिंटिंग मिस्टेक असल्याचं सांगितलं. राहुल गांधींनीही कुठली डिग्री घेतलेली नाही. आंबेडकरांनी अभ्यासपूर्ण पीएचडी डिग्री घेतल्याने त्यांची नेहरुंना असूया होती.” असंही स्वामी म्हणाले.

याशिवाय स्वामींनी राम मंदिर आणि काश्मीर प्रश्नावरुन रोखठोक मतं मांडली. काहीही झालं तरी राम मंदिराच्या बाजूनेच निकाल लागणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच काश्मीर प्रश्न चर्चेतून सुटणार नाही. तर त्यासाठी पुरुषार्थ दाखवण्याची गरज असल्याचं ते यावेळी म्हणाले.

Nasik News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:BJP leader Subrmanyam Swamis controversial statement on minority communities
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

नाशकात कारमध्येच गर्भलिंग निदान चाचणी केंद्र!
नाशकात कारमध्येच गर्भलिंग निदान चाचणी केंद्र!

नाशिक : नाशिकच्या सातपूरमध्ये एका कारमध्ये गर्भलिंग निदान चाचणी

नाशिकमध्ये जन्मलेल्या महिलेचं गुगल डूडल!
नाशिकमध्ये जन्मलेल्या महिलेचं गुगल डूडल!

मुंबई: नाशिकमध्ये जन्मलेल्या महिलेचा गुगलने यथोचित सन्मान केला

अधिकृत फेरीवाल्यांना हटवणं गैर: संजय राऊत
अधिकृत फेरीवाल्यांना हटवणं गैर: संजय राऊत

नाशिक: फेरीवाल्यांवरुन सुरु असलेल्या वादात आता शिवसेनेने उडी

नाशिक आणि निफाडचा पारा 10 अंश सेल्सिअसवर
नाशिक आणि निफाडचा पारा 10 अंश सेल्सिअसवर

नाशिक : हिवाळ्यात मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यभर थंडीचा जोर वाढला आहे.

राणे मंत्री होणार, अन् सरकारही स्थिर राहणार : गिरीश बापट
राणे मंत्री होणार, अन् सरकारही स्थिर राहणार : गिरीश बापट

नाशिक : नारायण राणे मंत्री होणारच असा पुनरुच्चार अन्न पुरवठा मंत्री

जमिनीवर बसून राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांशी संवाद
जमिनीवर बसून राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांशी संवाद

नाशिक : मुंबईतील मनसेच्या सात पैकी सहा नगरसेवकांनी पक्षाला

35 तोळे सोन्याची चोरी, एका वर्षाने तक्रार, 12 तासात चोर गजाआड
35 तोळे सोन्याची चोरी, एका वर्षाने तक्रार, 12 तासात चोर गजाआड

नाशिक : एक वर्षापूर्वी चोरीला गेलेलं 35 तोळे सोनं आणि 15 किलो चांदी

नाशिकमध्ये 30-40 शेतकऱ्यांना अन्नातून विषबाधा, एकाचा मृत्यू
नाशिकमध्ये 30-40 शेतकऱ्यांना अन्नातून विषबाधा, एकाचा मृत्यू

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीमध्ये 30 ते 40 शेतकऱ्यांना अन्नातून

समृद्धी महामार्ग आंदोलनाला राज ठाकरे पाठिंबा देणार?
समृद्धी महामार्ग आंदोलनाला राज ठाकरे पाठिंबा देणार?

नाशिक : समृद्धी महामार्ग विरोधात शेतकऱ्यांनी आता मनसे अध्यक्ष राज

रस्त्यावरचे खड्डे मोजणारं 'इस्रो'चं मोबाईल अॅप
रस्त्यावरचे खड्डे मोजणारं 'इस्रो'चं मोबाईल अॅप

नाशिक : गुगल मॅपवर तुम्ही रस्ते, ट्राफीकची माहिती सहज मिळवता. तशीच