नाशिकमध्ये सरकारी कार्यालयांमध्येच डेंग्यूच्या अळ्या सापडल्या

नाशिकमध्ये सरकारी कार्यालयांमध्येच डेंग्यूच्या अळ्या सापडल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांना स्वच्छतेचे डोस पाजणाऱ्या सरकारच्या विविध विभागात अळ्या आढळल्यानं खळबळ उडाली आहे. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयासह सिक्युरिटी प्रेस, उत्पादन शुल्क कार्यालय, एसटी महामंडळाच्या कार्यालयाच्या आवारात डेंग्युच्या अळ्या आढळून आल्या आहेत. महापालिकेनं या सर्व विभागांना नोटीस बजावली आहे.

नाशिकमध्ये सरकारी कार्यालयांमध्येच डेंग्यूच्या अळ्या सापडल्या

नाशिक : नाशिकमध्ये सरकारी कार्यालयांमध्येच डेंग्यूच्या अळ्या सापडल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांना स्वच्छतेचे डोस पाजणाऱ्या सरकारच्या विविध विभागात अळ्या आढळल्यानं खळबळ उडाली आहे. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयासह सिक्युरिटी प्रेस, उत्पादन शुल्क कार्यालय, एसटी महामंडळाच्या कार्यालयाच्या आवारात डेंग्युच्या अळ्या आढळून आल्या आहेत. महापालिकेनं या सर्व विभागांना नोटीस बजावली आहे.

नाशिकमध्ये संभाव्य डेंग्युचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेनं शहरात नुकतीच तपासणी मोहीम राबवली. सुमारे 80 हजार घरांच्या पाहणीत 335 घरात डेंग्युच्या अळ्या सापडल्या. त्यापैकी 283 लोकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. सातपूर, नाशिकरोड विभागात सर्वाधिक अळ्या सापडल्या आहेत. या मोहिमेत नागरिकांना घरासह कार्य़ालयांच्या परिसरात दक्षता घेण्याचं आवाहन करण्यात आलं. मात्र या पाहणीत सरकारी कार्यालयांनीच पंतप्रधान मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाला केराची टोपली दाखवल्यांच चित्र आहे.

नागरिकांच आरोग्य सदृढ करण्याची जबाबदारी ज्या जिल्हा रुग्णालयावर आहे, त्याच रुग्णालयात अळ्या सापडल्या आहेत. विशेषत: भंगार, टायर, नवीन बांधकामं, बेसमेंट याठिकाणी या अळ्या आढळून आल्याचं महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आलं. या संदर्भात संबंधितांना विभागांना नोटीसही बजावण्यात आली आहे.

नाशिक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV