फडणीस घोटाळ्याची ईडीकडून चौकशी सुरु

फडणीस घोटाळ्याची ईडीकडून चौकशी सुरु

नाशिक : नाशिकसह महाराष्ट्रात गाजलेल्या फडणीस घोटाळ्याची आता ईडीकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे. नाशिक आर्थिक गुन्हे शाखेकडून याबाबत सर्व माहिती मागवण्यात आली आहे.

पुण्यातील फडणीस ग्रुपचा सूत्रधार विनय फडणीसला नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने  काल (21 एप्रिल) मुंबईतील विक्रोळीतून अटक केली. त्यानंतर त्याला कोर्टात हजर केले गेले. कोर्टाने विनय फडणीसला 29 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. त्याला न्यायालयात आणताच गुंतवणूकदारांनी गर्दी करत त्याच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली होती.

मूळच्या पुण्यातील असलेल्या विनय फडणीस आणि फडणीस ग्रुपवर आजपर्यंत नाशिकमध्ये फसवणुकीचे एकूण 5 गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे नाशिक शहरातूनच फडणीस ग्रुपविरोधात तब्बल 275 तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडे प्राप्त झाल्या असून त्यानुसार आतापर्यत जवळपास 11 कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचं उघडकीस आले आहे.

फडणीस ग्रुपवर गुन्हा दाखल होताच 6 महिन्यापासून या ग्रुपचा मुख्य सूत्रधार विनय फडणीस फरार होता. पोलिस त्याचा शोध घेत होते. अखेर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार फडणीसला मुंबईतून अटक केली.

फडणीस घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून मागील 3 वर्षांपासून गुंतवणूकदारांना त्यांचे व्याज तसेच मुद्दल देखील मिळालेली नाही.

फडणीस ग्रुपचे महाराष्ट्रातच 8000 च्या आसपास  गुंतवणूकदार असून नाशिकमध्येच 2500 गुंतवणूकदार आहेत. एकूण तब्बल 300 कोटींचा हा घोटाळा असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

पुण्यातील एक मोठ प्रस्थ म्हणून विनय फडणीस यांची ओळख असून बांधकाम, हॉटेल, रिअल इस्टेट मध्ये ते कार्यरत आहेत. फडणीस ग्रुपच्या विनय फडणीससह त्यांची पत्नी आणि नातेवाईकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांनाही अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

अनेक महिन्यांपासून गुन्हे दाखल होऊनही विनय फडणीसला अटक होत नसल्याने गुंतवणूकदारांनी पोलिस आयुक्तालयातच आंदोलनही केले होते. मात्र, आता फडणीसला अटक होताच, विशेष पथकामार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिस सांगत आहे.

संबंधित बातमी : शेकडो लोकांची फसवणूक करणारा विनय फडणीस मुंबईतून अटक

First Published:

Related Stories

रेल्वेच्या धडकेने मृत्यू, रात्रभर मृतदेह रेल्वे ट्रॅक शेजारीच
रेल्वेच्या धडकेने मृत्यू, रात्रभर मृतदेह रेल्वे ट्रॅक शेजारीच

वर्धा : पुलगाव लगतच्या वर्धा नदीच्या मोठ्या रेल्वे पुलाजवळ

खासदार राजू शेट्टींची आत्मक्लेश यात्रा मुंबईत दाखल
खासदार राजू शेट्टींची आत्मक्लेश यात्रा मुंबईत दाखल

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांची

जो महाराष्ट्राचं भलं करतो, त्याला काहीही होणार नाही : मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री
जो महाराष्ट्राचं भलं करतो, त्याला काहीही होणार नाही :...

अमरावती : जो सदैव महाराष्ट्राचे हित चिंततो, त्याला काहीही होणार

बारावी CBSE बोर्डाचा निकाल जाहीर, रक्षा गोपाळ देशात पहिली
बारावी CBSE बोर्डाचा निकाल जाहीर, रक्षा गोपाळ देशात पहिली

नवी दिल्ली : बारावीच्या सीबीएसई बोर्डाचा ऑनलाईन निकाल लागला आहे.

गणपतीसाठी 'तेजस' फुल्ल, कोकणातील चाकरमानी वेटिंगवर
गणपतीसाठी 'तेजस' फुल्ल, कोकणातील चाकरमानी वेटिंगवर

मुंबई : कोकण रेल्वेमार्गावर नव्याने सुरु झालेल्या हायटेक तेजस

आता राज्यातील प्रत्येक एसटीवर 'जय महाराष्ट्र'ची पाटी
आता राज्यातील प्रत्येक एसटीवर 'जय महाराष्ट्र'ची पाटी

मुंबई : राज्य परिवहन मंडळाच्या प्रत्येक बसवर आता ‘जय

बारावीच्या सीबीएसई बोर्डाचा ऑनलाईन निकाल जाहीर
बारावीच्या सीबीएसई बोर्डाचा ऑनलाईन निकाल जाहीर

मुंबई : बारावीच्या सीबीएसई बोर्डाचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला आहे. तर

येत्या 48 तासात मान्सून देवभूमीत दाखल होणार
येत्या 48 तासात मान्सून देवभूमीत दाखल होणार

मुंबई : पुढील दोन दिवसात मान्सून केरळात दाखल होणार आहे, अशी माहिती

महाबळेश्वरमध्ये पर्यटक कर मागितल्याने शिवसेना आमदाराची मारहाण
महाबळेश्वरमध्ये पर्यटक कर मागितल्याने शिवसेना आमदाराची मारहाण

महाबळेश्वर (सातारा)  : शिवसेनेच्या आमदाराच्या गुंडगिरीची घटना

वर्ध्यातील भिष्णुरात भीषण आग, 15 घरं जळून खाक
वर्ध्यातील भिष्णुरात भीषण आग, 15 घरं जळून खाक

वर्धा : आष्टी तालुक्यातील भिष्णुर गावातील भीषण आगीत 15 घरं जळून खाक