फेसबुकवरुन मैत्री, वर्षभर बलात्कार, व्हिडीओ शूट करुन ब्लॅकमेल

फेसबुकवरुन मैत्री करुन वर्षभर बलात्कार करणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून अटक, नाशिकमधील धक्कादायक घटना

By: | Last Updated: 08 Aug 2017 01:42 PM
फेसबुकवरुन मैत्री, वर्षभर बलात्कार, व्हिडीओ शूट करुन ब्लॅकमेल

नाशिक : नाशिकमध्ये दिवसेंदिवस गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचं प्रमाण वाढत असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फेसबुकवर मैत्री करुन शाळकरी मुलीवर तिच्या मित्रानेच वर्षभर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या सिडको परिसरात घडली आहे.

दोघेही नाशिकच्या एका नामांकित इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षण घेत असताना त्यांची फेसबुकच्या माध्यमातून अडीच वर्षांपूर्वी मैत्री झाली होती. सध्या मुलगी दहावीत शिकत असून मुलगा अकरावीचं शिक्षण घेतो आहे.

मैत्रीतून मुलाने जबरदस्तीने अत्याचार केले आणि त्याचे चित्रीकरण करून मुलीच्या घरी व्हिडीओ दाखवण्याची धमकी देत नंतर वारंवार असे प्रकार केल्याची तक्रार पीडित मुलीने पोलिसांकडे दिली आहे. हा सर्व प्रकार मुलीच्या आईला समजला असता तिने मुलाला याबाबत विचारणा केली. मात्र, मुलाने आईला शिवीगाळ केल्याचं देखील या तक्रारीत उल्लेख असून या तक्रारीनुसार पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे.

दरम्यान, मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून सोशल मीडियाच्या गैरवापरातून हे सर्व प्रकार होत असल्याचं त्यांनी सांगितलं. अंबड पोलिस स्टेशनला मुलाविरोधात बलात्कार आणि पोक्सो कायद्याअंतर्गत काल रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला.

नाशिक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV