गिरीश महाजनांचा पीए असल्याचा बनाव, नाशकात एकाला अटक

गिरीश महाजनांचा पीए असल्याचा बनाव, नाशकात एकाला अटक

नाशिक : राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या तोतया पीएला नाशिक पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली आहे. संदीप त्र्यंबक पाटील असं या बोगस पीएचं नाव आहे. स्वत:ला गिरीश महाजनांचा पीए म्हणवणारा हा तोतया शहाद्याचा रहिवासी आहे.

गिरीश महाजन राज्याचे जलसंपदा मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. संदीप पाटील गिरीश महाजनांचा पीए असल्याचं सांगत होता आणि दादागिरी, धिंगाणा घालत होता, अशी तक्रार पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आली होती. त्यांनतर महाजन यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला.

girish mahajan fake pa

नाशिकच्या ठक्कर बस स्थानकावरील एका हॉटेलमध्ये वाद घालत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर मंगळवारी मध्यरात्री नाशिक पोलिसांनी संदीपला अटक केली. सरकारवाडा पोलीस ठाण्यात संदीपवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आपल्या नावाने गैरप्रकार करणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका. पोलिसांना अशा बोगस लोकांची माहिती द्या, असं आवाहन गिरीश महाजन यांनी केलं आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV