नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान शेतकऱ्यांचा गोंधळ

लासलगावमधल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत सरसकट कर्जमाफी आणि हमीभाव देण्याची मागणी केली आहे. कोल्ड स्टोरेजच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू होतं. त्यावेळी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली.

farmers protest during cms speech in nashik latest news updates

नाशिक : लासलगावमधल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत सरसकट कर्जमाफी आणि हमीभाव देण्याची मागणी केली आहे. कोल्ड स्टोरेजच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू होतं. त्यावेळी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली.

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर आहेत. लासलगावमध्ये मुख्यमंत्री शेतकऱ्यांना संबोधित करत असताना काही शेतकरी उठले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करायला सुरूवात केली. मुख्यमंत्र्यांनी घोषणाबाजी करणाऱ्या शेतकऱ्यांना खडे बोल सुनावत खाली बसण्याची विनंती केली. मात्र शेतकऱ्यांनी घोषणाबाजी सुरुच ठेवली.

घोषणाबाजी करणाऱ्या शेतकऱ्यांचा आवाज दडपण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना टाळ्या वाजवण्याचं आवाहन केलं. जेव्हा हा सगळा प्रकार घडला, त्यावेळी व्यासपीठावर रेल्वेमंत्री सुरेक्ष प्रभू, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, तसंच गिरीश महाजन आणि जयकुमार रावलही उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस आज नाशिक दौऱ्यावर असताना शिवडे गावातील शेतकऱ्यांनी स्वत:च्या रक्ताने समृद्धी महामार्गाच्या विरोधासाठी पत्र लिहिलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्यात विरोधाचे सूर उमटले आहेत.

समृद्धी महामार्गावरुन शेतकरी आक्रमक, नाशिक दौऱ्यात मुख्यमंत्र्यांना ‘रक्त’पत्र

Nasik News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:farmers protest during cms speech in nashik latest news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

नाशिकच्या विकासासाठी 'इस्रो'चं पाऊल, देशातील पहिलं शहर
नाशिकच्या विकासासाठी 'इस्रो'चं पाऊल, देशातील पहिलं शहर

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी ‘इस्रो’नं आपल्या

मुंबई-पुण्यानंतर आता नाशिकमध्येही ‘व्हर्च्युअल गेम झोन’!
मुंबई-पुण्यानंतर आता नाशिकमध्येही ‘व्हर्च्युअल गेम झोन’!

नाशिक : नाशिकमधील गेम लव्हर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई,

नाशकात हॉटेल-पेट्रोलपंपांचे टॉयलेट्स महिलांसाठी मोफत
नाशकात हॉटेल-पेट्रोलपंपांचे टॉयलेट्स महिलांसाठी मोफत

नाशिक : सार्वजनिक शौचालयांअभावी होणारी महिलांची कुंचबना

फुगा गिळल्याने 8 महिन्याच्या बाळाचा मृत्यू
फुगा गिळल्याने 8 महिन्याच्या बाळाचा मृत्यू

नाशिक : लहान मुलांना तुम्ही फुगा खेळायला देत असाल तर हजार वेळा विचार

फेसबुकवरुन मैत्री, वर्षभर बलात्कार, व्हिडीओ शूट करुन ब्लॅकमेल
फेसबुकवरुन मैत्री, वर्षभर बलात्कार, व्हिडीओ शूट करुन ब्लॅकमेल

नाशिक : नाशिकमध्ये दिवसेंदिवस गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचं

सरकारी मालमत्तेच्या चोरीची परवानगी द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र
सरकारी मालमत्तेच्या चोरीची परवानगी द्या, शेतकऱ्याचं...

नाशिक : सरकारी मालमत्तेची चोरी करण्यासाठीचा परवाना मिळावा असा

सोनू, तू पोलिसांशी नीट बोल, नाशिकच्या चिमुकल्यांची गाण्यातून जनजागृती!
सोनू, तू पोलिसांशी नीट बोल, नाशिकच्या चिमुकल्यांची गाण्यातून...

नाशिक : सोशल मीडियावर सोनूचा धुमाकूळ सुरुच आहे. आरजे मलिष्कामुळे

बटाटे शिजवताना कुकरचा स्फोट, वडापाव विक्रेत्याचा मृत्यू
बटाटे शिजवताना कुकरचा स्फोट, वडापाव विक्रेत्याचा मृत्यू

नाशिक : बटाटे शिजवताना कुकरचा स्फोट होऊन वडापाव विक्रेत्याचा

समृद्धी महामार्गावरुन शेतकरी आक्रमक, नाशिक दौऱ्यात मुख्यमंत्र्यांना 'रक्त'पत्र
समृद्धी महामार्गावरुन शेतकरी आक्रमक, नाशिक दौऱ्यात...

नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला होणारा शेतकऱ्यांचा विरोध

गोदावरी दुथडी भरुन, दुतोंड्या मारुतीच्या मानेपर्यंत पाणी
गोदावरी दुथडी भरुन, दुतोंड्या मारुतीच्या मानेपर्यंत पाणी

नाशिक : नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आला आहे. मागील आठवड्यात