वडिलांकडून तीन मुलांना जीवे मारण्याचा प्रयत्न, दोघांचा मृत्यू

वडिलांकडून तीन मुलांना जीवे मारण्याचा प्रयत्न, दोघांचा मृत्यू

नाशिक : नाशिकमध्ये वडिलांनीच 3 मुलांना जीवे मारण्याचा प्रयत्न करुन स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात 2 लहान मुलांचा मृत्यू झाला असून मुलगी गंभीर जखमी आहे.

मृतांमध्ये एक मुलगा आणि एका मुलीचा समावेश आहे. नाशिक रोड परिसरातील जगताप मळा परिसरात ही खळबळजनक घटना घडली.

सुनील बेलदार असं वडिलांचं नाव असून ते विद्यार्थ्यांचे क्लासेस घेतात.

सुनीलने 6 वर्षांच्या देवराज आणि 8 वर्षांच्या वैष्णवीची गळा आवळून हत्या केली. तर 12 वर्षांच्या मुलीला विष पाजलं. सध्या ती मृत्युशी झुंज देत आहे.

मुलं मृत्युमुखी पडल्याचं समजून सुनील बेलदार यांनी रॉकेल टाकून स्वत:ला जाळून घेतलं. यात सुनील बेलदारही गंभीर जखमी आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV