10 रुपयाचं नाणं गिळल्याने साडेचार वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

दहा रुपयाचं नाणं गिळल्यानं साडेचार वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या चांदगिरी गावात घडली आहे.

10 रुपयाचं नाणं गिळल्याने साडेचार वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

नाशिक : दहा रुपयाचं नाणं गिळल्यानं साडेचार वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या चांदगिरी गावात घडली आहे. शालिनी हांडगे असं मयत मुलीचं नावं असून उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समजते आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील शिंदे पळसेजवळील चांदगिरी गावात राहणाऱ्या शालिनीने  काल (रविवार) दुपारी खेळता खळता दहा रुपयाचं नाणं गिळलं होतं. त्यानंतर शालिनी झोपी गेली. मात्र, अचानक त्रास होऊ लागल्याने तात्काळ तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी तिने नाणं गिळल्याचं समोर आलं.

शालिनीवर रुग्णालयात उपचारही सुरु करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला. पण उपचारात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला आहे. दरम्यान, या घटनेनं हांडगे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

नाशिक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: four and a half year old girl died due to swallowing 10 rupees coin latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV