दामदुप्पट योजनेचं आमिष, नाशकात अनेकांना कोट्यवधींचा गंडा

नाशिक शहरातील केबीसी फसवणूक प्रकरणानंतरही दामदुप्पट योजेनेच्या आमिषाला बळी पडून फसवणुकीचे प्रकार थांबलेले नाहीत.

दामदुप्पट योजनेचं आमिष, नाशकात अनेकांना कोट्यवधींचा गंडा

नाशिक : दामदुप्पट योजनेला बळी पडणाऱ्यांची नाशिकमध्ये फसवणूक झाली आहे. नाशिक शहरातील केबीसी फसवणूक प्रकरणानंतरही दामदुप्पट योजेनेच्या आमिषाला बळी पडून फसवणुकीचे प्रकार थांबलेले नाहीत.

कोपरगावच्या व्हिनस कॅपिटल कंपनीच्या माध्यमातून शेतकरी, शिक्षक, निवृत्त लष्करी जवान व्यावसायिक अशी अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. कोपरगावसह नाशिक, नगर, पुणे जिह्यातील असंख्य गुंतवणूकदार तक्रारीसाठी पुढे येत आहेत.

कोपरगावसह नाशिक शहर आणि ग्रामीण पोलिसातही फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. पोलीस एकीकडे गुन्हे दाखल करत आहेत, मात्र दुसरीकडे छुप्या पद्धतीने बनावट नावाने कंपनीचा कारभार सुरु असल्याचा आरोप गुंतवणूकदार करत आहेत.

याप्रकरणी तीन संशयितांना कोपरगाव पोलिसांनी अटक केली आहे. नाशिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून पुढील तपास सुरु आहे.

नाशिक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Fraud in Nashik three arrested by police probe underway
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV