कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार जाहीर

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने 1992 पासून ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार देण्यास सुरुवात झाली.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार जाहीर

नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘गोदावरी गौरव’ पुरस्कारांची घोषणा झाली आहे. अभिनेते अमोल पालेकर यांच्यासह एकूण आठ जणांना यंदा पुरस्कार घोषित झाले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी नाशिकमध्ये यासंदर्भात माहिती दिली.

21 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं ‘गोदावरी गौरव’ पुरस्काराचं स्वरुप असते. येत्या 10 मार्च रोजी नाशिकमध्ये पुरस्कार वितरण सोहळा पार पडेल.

कुणा-कुणाला गोदावरी गौरव पुरस्कार?

  • अमोल पालेकर (नाट्य, चित्र)

  • सत्यशील देशपांडे (संगीत)

  • डॉ रविंद्र आणि स्मीता कोल्हे (लोकसेवा)

  • डॉ. स्नेहलता देशमुख (ज्ञान)

  • सुभाष अवचट (चित्रकला)

  • सुदर्शन शिवाजी शिंदे आणि महेश पांडुरंग साबळे (क्रीडा आणि साहस)


कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने 1992 पासून ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. विविध सहा क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींचा सन्मान कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने केला जातो.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Godavari Gaurav Award announced by Kusumagraj Pratishthan
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV