ग्राऊंड रिपोर्ट : ‘समृद्धी’ला विरोध करणाऱ्या शिवडे गावाची नेमकी व्यथा काय?

By: सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक | Last Updated: Saturday, 15 April 2017 2:54 PM
ग्राऊंड रिपोर्ट : ‘समृद्धी’ला विरोध करणाऱ्या शिवडे गावाची नेमकी व्यथा काय?

शिवडे (नाशिक) : समृद्धी महामार्गाला विरोध केल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शिवडे गाव सध्या राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. समृद्धी महामार्गच नव्हे, तर वेगवेगळ्या योजनांमध्ये जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्त गावांचं प्रतिनिधित्व सध्या शिवडे गाव करतं आहे.

नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील शिवडे गावाची लोकवस्ती 6 हजार 500 एवढी आहे. समृद्धी महामार्ग झाला तर आम्ही नक्षलवादी बून असं म्हणत हिंसक पद्धतीने या कामाला विरोध केल्याने हे गाव सध्या राज्यात चर्चेचा विषय झालं आहे.

समृद्धीला शिवडे ग्रामस्थांचा तीव्र विरोध

मुंबई नागपूर एक्सप्रेस वे करून राज्याला समृद्ध करण्याचं माध्यम म्हणून जे काम भाजप सरकारने हाती घेतलं, त्याला हे गाव इतकं पोटतिडकीने विरोध का करतय हे जाणून घेण्यासाठी आम्ही शिवडेत पोहचलो. अधिकारी मोजणी करायला आले की तुटून पडायचं या एकाच इराद्याने इथे जागोजागी तरुणांचे, महिलांचे, माणसांचे घोळके जमलेले दिसतात.

Shivade 1

भयाण शांतता

शिवडेतल्या लोकसंख्येपैकी 60 टक्के लोकसंख्या आदिवासी समाजाची आहे. शेतीवर मोलमजुरी, जोडधंदे करुन जगणारा हा समाज. त्यांना शोधत आम्ही आदिवासी मजूर वाडीत गेलो तर तिथेही भयाण शांतता होती. समृद्धी महामार्गासाठी जमीन गेली तर आम्हीही संपू, अशी आर्त भावना इथे लोकांशी बोलताना जाणवली.

“जमिनी गेल्या तर भिकेला लागू”

शिवडे गाव तसं प्रगतशील शेतीसाठी प्रसिद्ध आहे. सरकारच्या लेखी 1 हजार 300 हेक्टर शेतजमीन आहे. त्यापैकी 800 हेक्टर जमीन बागायती तर 500 हेक्टर जिरायती. द्राक्ष, ऊस, टोमॅटो, काकडी, भाजीपाला, नगदी पीक प्रामुख्याने इथे घेतली जातात. शिवडेतला द्राक्ष, टोमॅटो निर्यातीत खास. इथले अनेक शेतकरी निर्यातदार म्हणून ओळखले जातात. अनेकांचा भाजीपाला, नगदी पीक रोज पुण्यात, मुंबई वाशीत विक्रीला जातो. त्यामुळे संपन्नता. मात्र समृद्धीसाठी जमिनी गेल्या तर भिकेला लागू अशी या शेतकऱ्यांची कैफियत आहे.

Shivade

“…तर नक्षली बनू”

समृद्धी महमार्गामुळे केवळ बागायती शेतीच नाही यावर अवलंबून असलेले मजूर, जोडधंदे करणारे लोकही विस्थापित होणार आहे. इतकंच नाही तर 2 किलोमीटर अंतरापर्यंत पसरलेला पाझर तलाव आणि 70 पाणीदार विहिरीही नष्ट होणार आहे आणि म्हणून आत्महत्या करू, नक्षली बनू पण जमिनी देणार नाही असं हे शेतकरी पोटतिडकीने सांगतात.

समृद्धीमागोमाग येणाऱ्या अनंत अडचणींचं काय?

विषय फक्त अधिग्रहित होणाऱ्या जमिनीचा नाही. त्यामागोमाग येणाऱ्या इतर अनंत अडचणीचाही आहे. एकदा हा मार्ग बांधला गेला तर अनेक मीटरपर्यंत नव्या विहिरी खोदता येणार नाही. अपघात, पर्यावरणहानी आणि यासारखे इतर विकासासोबत येणारे दुष्परिणाम अनेक आहेतच.

कर्जबाजारी झाल्याने शेतकरी आत्महत्या करतात हे आपण कायम ऐकतो. पण समृद्धी महामार्गासारखे विकासकाम केल्यानेही प्रगतशील शेतकऱ्यांच मरण होउ शकत हे समजून घ्यायच असेल तर सरकारने शिवडेत यावं. हैवही गेलं आणि दैवही अशी इथल्या शेतकऱ्यांची परिस्थिती झाली आहे.

First Published: Wednesday, 12 April 2017 9:16 AM

Related Stories

बेळगावात अग्नितांडव, 50 हून अधिक घरं बेचिराख
बेळगावात अग्नितांडव, 50 हून अधिक घरं बेचिराख

बेळगाव : सौंदत्ती तालुक्यातील हंचिनाळ गावात लागलेल्या भीषण आगीत 50

बिल्डरांच्या मनमानीला चाप लावणाऱ्या 'रेरा'ची उद्यापासून अंमलबजावणी
बिल्डरांच्या मनमानीला चाप लावणाऱ्या 'रेरा'ची उद्यापासून...

मुंबई : बांधकाम क्षेत्रात बदल घडवणाऱ्या ‘रिअल इस्टेट रेग्युलेशन

निवृत्त पोलिसाला मंदिरात राहण्याची वेळ, भूमाफियावर कारवाई सुरु
निवृत्त पोलिसाला मंदिरात राहण्याची वेळ, भूमाफियावर कारवाई सुरु

नागपूर : नागपुरातील निवृत्त पोलिस कर्मचारी बाबाराव ढोमणे यांचा

कोकणात येत्या 24 तासांत मुसळधार पाऊस!
कोकणात येत्या 24 तासांत मुसळधार पाऊस!

मुंबई : उन्हाने अंगाची काहिली होत असताना आता कोकणवासियंना थोडा

चाकूने वार करुन रत्नागिरीत सासूकडून 24 वर्षीय सुनेची हत्या
चाकूने वार करुन रत्नागिरीत सासूकडून 24 वर्षीय सुनेची हत्या

रत्नागिरी : चाकूने वार करुन सासूनेच सुनेची हत्या केल्याची

अवाजवी दरवाढ करणाऱ्या सिमेंट कंपनी मालकांना तुरुंगात टाकू : गडकरी
अवाजवी दरवाढ करणाऱ्या सिमेंट कंपनी मालकांना तुरुंगात टाकू : गडकरी

नागपूर : अवाजवी दरवाढ करणाऱ्या सिमेंट कंपनीच्या मालकांना तुरुंगात

महाराष्ट्रदिनी 'पानी फाऊण्डेशन'ची मराठवाड्यात 'चला गावी' मोहीम
महाराष्ट्रदिनी 'पानी फाऊण्डेशन'ची मराठवाड्यात 'चला गावी' मोहीम

मुंबई : मराठवाड्यातील चार गावांमध्ये चला गावी दुष्काळमुक्तीसाठी

जालना जिल्ह्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
जालना जिल्ह्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

जालना : जालना जिल्ह्यात आज एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या

सीता-द्रौपदीसारखी अगतिकता, पालघर जि.प. CEO निधी चौधरींचा संताप
सीता-द्रौपदीसारखी अगतिकता, पालघर जि.प. CEO निधी चौधरींचा संताप

पालघर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका महिला आयएएस अधिकाऱ्यासाठी

चंद्रपूरमध्ये इंजिनिअरिंग परिक्षेत 'मुन्नाभाई'चा वावर, दोन विद्यार्थी अटकेत
चंद्रपूरमध्ये इंजिनिअरिंग परिक्षेत 'मुन्नाभाई'चा वावर, दोन...

चंद्रपूर : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने