एकाच वेळी 9 ढोल पथकांची सलामी, नाशिकमध्ये नववर्षाचं जल्लोषी स्वागत

नाशिकमध्येही नव्या वर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं.

एकाच वेळी 9 ढोल पथकांची सलामी, नाशिकमध्ये नववर्षाचं जल्लोषी स्वागत

नाशिक:  नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईमध्ये मरिन ड्राईव्ह आणि गेट वे ऑफ इंडियावर नागरिकांनी जल्लोष केला.

तर नाशिकमध्येही नव्या वर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. नाशिकमध्ये सांस्कृतिक वारसा जपत दरवर्षी प्रमाणे यंदाही सहस्त्रदिप प्रज्वलन सोहळा रामकुंडावर पार पडला.

nashik dive

स्वामी मित्र मेळा संस्थेच्या वतीने रात्री 12 वाजता सरत्या वर्षाला निरोप देण्यात आला.

सोबतच गोदावरीची विधिवत पूजा आणि आरती करण्यात आली. यावेळी नदीमध्ये हजारो दिवे सोडण्यात आले..

nashik dive2

नदी काठच्या या सोहळ्याच्या वेळी ढोल पथकानंही आपली कला सादर केली. एकाच वेळी 9 ढोल पथकांनी एकत्रित ढोल वादन केलं.

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Happy New Year 2018 : Nashik Dhol new year celebration
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV