LIVE: नाशिकमधील दारणा धरणातून 12 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग

नाशिक जिल्ह्यात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुंळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहतुकीचाही खोळंबा झाला असून लोकांचे हाल होत आहेत.

heavy rain slashes Nashik latest photo update

नाशिक: नाशिक जिल्ह्यात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. इगतपुरीत 193 मिलिमीटर, त्र्यंबकेश्वरमध्ये 125 मिलिमीटर तर सुरगण्यात 111 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मुसळधार पावसामुंळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहतुकीचाही खोळंबा झाला असून लोकांचे हाल होत आहेत.

पाण्यात वाहून गेलेल्या वस्तू वाचवताना लोकांची अक्षरश: तारांबळ उडाली.

 

– दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, 12 हजार क्युसेक पाण्याच विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा  

 

Nashik flood2

गोदावरीत गटाराचं पाणी

नाशिक शहरातही सकाळपासून संततधार सुरुच आहे. दुसरीकडे गोदावरीच्या नदीत गटाराचं पाणी शिरल्यानं गोदेचं पाणी प्रदूषित झालं आहे. नाशिक शहरातील गटारी आणि नाल्यांचे पाणी थेट नदीपात्रात मिसळल्याचं चित्र आहे. यामुळे रामकुंड आणि गोदावरी नदीकिनारी पाण्याची दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे स्थानिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. गोदावरी नदीतल्या दुतोंड्या मारूतीच्या कमरेपर्यंत पाणी पोहोचलं आहे.

 

nsk flood4

घोटी-सिन्नर महामार्ग वाहतुकीसाठी बंद

नाशिक जिल्ह्यातल्या घोटी-सिन्नर महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. देवळे पुलाला भगदाड पडल्यामुळे वाहतूक रोखण्यात आली आहे. तहसिलदारांनी वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

वाहनं रोखण्यात आल्यानं वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या.

nsk flood5

वाहून जाणारी कार बाहेर काढली

नाशिकमध्ये गाडगे महाराज पुलाजवळ एक कार पुराच्या पाण्यात वाहून जात होती. या परिसरात पूरसदृश्य स्थिती झाली होती. यातच कार वाहून जात होती. पण स्थानिकांच्या अथक प्रयत्नानंतर गाडी बाहेर काढण्यात आली आहे.

Nashik flood1

युवासेनेचं आंदोलन

नाशिकमध्ये मुसळधार पावसानं जागोजागी पाणी साचलं आहे.  त्यामुळे युवा सेनेनं अनोखं आंदोलन केलं.

पाणी तुंबलंय त्या ठिकाणी शिवसैनिकांनी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस वॉटर पार्क नावाचा बॅनर लावला आणि त्याच पाण्यात पोहून आंदोलन केलं.

शिर्डीतही पावसाचं पुनरागमन

तर तिकडे, शिर्डीतही काही दिवस दडी मारल्यानंतर पावसानं पुनरागमन केलं. भंडारधरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसानं दमदार हजेरी लावली. यामुळे बळीराजाच्या भात शेतीच्या दुबार पेरणीचं संकट टळलं.

संगमनेर, अकोले भागात मुसळधार तर श्रीरामपूर, शिर्डी, राहता परिसरात रिमझिम पावसाच्या सरी बरसत आहेत.

Nasik News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:heavy rain slashes Nashik latest photo update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

मॅट्रिमोनिअल वेबसाईटवरुन तरुणीला लाखोंचा गंडा, नायजेरियन तरुण अटकेत
मॅट्रिमोनिअल वेबसाईटवरुन तरुणीला...

नाशिक : मॅट्रिमोनिअल वेबसाईट्सवरुन लग्नाचं आमिष दाखवत एका तरुणीला 1

नाशिकमध्ये पत्नी, सासूच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या
नाशिकमध्ये पत्नी, सासूच्या त्रासाला...

नाशिक : पत्नी आणि सासूच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या

नाशिकमधील उंटदरी घाटात 600 मीटर खोल दरीत कार कोसळली!
नाशिकमधील उंटदरी घाटात 600 मीटर खोल...

नाशिक : नाशिकमधील कसाऱ्याजवळ उंटदरी घाटातील दरीत कार कोसळल्याची

आमदार बच्चू कडू यांना नाशिकमध्ये अटक!
आमदार बच्चू कडू यांना नाशिकमध्ये अटक!

नाशिक : आमदार बच्चू कडू यांना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटक

आ. बच्चू कडूंनी नाशिक महापालिकेच्या आयुक्तांवरच हात उगारला!
आ. बच्चू कडूंनी नाशिक महापालिकेच्या...

नाशिक: आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या समर्थकांनी नाशिक महापालिकेत

नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या पाण्यात सेल्फीसाठी तरुणाची स्टंटबाजी
नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या पाण्यात...

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील नांदूरमध्यमेश्वर धरणाची पातळी मुसळधार

नाशिकमध्ये सरकारी कार्यालयांमध्येच डेंग्यूच्या अळ्या सापडल्या
नाशिकमध्ये सरकारी कार्यालयांमध्येच...

नाशिक : नाशिकमध्ये सरकारी कार्यालयांमध्येच डेंग्यूच्या अळ्या

नाशिक महापालिकेत चक्क गायीला श्रद्धांजली
नाशिक महापालिकेत चक्क गायीला...

नाशिक : कथित गोरक्षकांचा राज्यासह देशभरात धुमाकूळ सुरु असतानाच

मुसळधार पावसानंतरही नाशिकच्या 15 पैकी 6 तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा
मुसळधार पावसानंतरही नाशिकच्या 15 पैकी...

नाशिक : गेल्या काही दिवसांत झालेल्या धुवांधार पावसानं नाशिकला

पत्नीला मारलेल्या दगडाचा नेम चुकला, बहिणीचा जागीच मृत्यू
पत्नीला मारलेल्या दगडाचा नेम चुकला,...

मनमाड : पत्नीवर राग काढताना भावाने चुकून बहिणीचाच जीव घेतल्याची