नाशिकमध्ये पावसाचा धुमाकूळ, अनेक वाहनं वाहून गेली

नाशिकमध्ये पावसाचा धुमाकूळ, अनेक वाहनं वाहून गेली

नाशिक : नाशिकमध्ये गेल्या दोन तासापासून पावसानं तुफान फटकेबाजी केली आहे. यामुळे सखल भागात पाणी साचलं असून अनेक वाहनंही वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. फक्त दुचाकीच नाही तर काही चारचाकी वाहनंही वाहून गेली आहेत. तसेच या पावसाचा वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.

सराफ बाजारात अनेक वाहने वाहून गेली असून दुकानांमध्येही पाणी घुसलं आहे. दीड तासाच्या मुसळधार पावसानेच नाशिक तुंबलं असून शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचलं आहे. यामुळे महापालिकेचा मान्सूनपूर्व कामाचा दावा फोल ठरला आहे.दुसरीकडे सटाणा तालुक्यातील अंबासन,मोराणे,काकड़गाव येथे मुसळधार पाऊस झाला.त्यामुळे शेतात सर्वत्र पाणीच् पाणी साचलं आहे.पावसाचं पाणी सखल भागातही शिरलं आहे.

सटाणा, चांदवड या तालुक्यात अनेक ठिकाणीही मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे वडाळी-भोई येथून वाहणाऱ्या विनीता नदीला पूर आला आहे.

नाशिक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV